जागतिक संशोधन समजून घ्या : नितीन गडकरी यांचे विदर्भातील शेतकऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:38 AM2019-01-19T00:38:42+5:302019-01-19T00:44:38+5:30

विदर्भातील संत्रा हा जागतिक पातळीवरचा आहे. या संत्र्याची निर्यात वाढवायची असेल तर विदर्भातील शेतकरी तसेच संशोधन संस्थांनी जगातील विविध भागातील आवड, मागणी समजून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील यशस्वी शेतकरी, संशोधकांशी संवाद साधायला हवा व जागतिक संशोधन जाणून घ्यायला हवे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या चार दिवसीय ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. 

Understand world research: Nitin Gadkari appealed to farmers of Vidarbha | जागतिक संशोधन समजून घ्या : नितीन गडकरी यांचे विदर्भातील शेतकऱ्यांना आवाहन

जागतिक संशोधन समजून घ्या : नितीन गडकरी यांचे विदर्भातील शेतकऱ्यांना आवाहन

Next
ठळक मुद्देवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’ची संत्रानगरीत धूम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील संत्रा हा जागतिक पातळीवरचा आहे. या संत्र्याची निर्यात वाढवायची असेल तर विदर्भातील शेतकरी तसेच संशोधन संस्थांनी जगातील विविध भागातील आवड, मागणी समजून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील यशस्वी शेतकरी, संशोधकांशी संवाद साधायला हवा व जागतिक संशोधन जाणून घ्यायला हवे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या चार दिवसीय ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. 


रेशीमबाग मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जा-उत्पादन शुल्क व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘यूपीएल’चे अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर व इंडस्ट्री रिलेशन्स) सागर कौशिक, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ‘ऑरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष पी.जी.जगदीश, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे ( सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक डॉ.एम.एस.लदानिया, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भाचा संत्रा हा ‘टेबलफ्रूट’ आहे. थोडा कडवटपणा असल्यामुळे आपल्याकडील संत्रे ‘ज्यूस’साठी फारसे वापरले जात नाही. मात्र जैवतंत्रज्ञान वापरुन आपल्या संत्र्यामधील गोडवा वाढविता येईल का यासंदर्भात प्रयत्न करायला हवा. सोबतच संत्र्यांचे ‘ग्रेडेशन’ हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. पंजाबमधील किन्नो आणि नागपूरच्या संत्र्यांचे ‘हायब्रिड’ तयार व्हावे. जागतिक पातळीवरील संशोधक भारतात येऊ इच्छित नाही. आपल्याकडे लगेच ‘कॉपी’ होते, त्यामुळे ते येथे येण्याचे टाळतात, असे गडकरी म्हणाले.
‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक ‘यूपीएल लिमिटेड’ असून महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन , महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कम्युनिटी कॉलेज ऑफ रोडे आयलँड, ऑरेंज ग्रोव्हर असोसिएशन ऑफ इंडिया, महाऑरेंज, कृषी विभागाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा सन्मानच
यावेळी गडकरी यांनी विदर्भाच्या विकासावर भाष्य केले. विदर्भाचा विकास झाला पाहिजे व वेगळे राज्य झाले पाहिजे, अशी मागणी होते. या भावनांचा सन्मानच करतो. मात्र राज्य वेगळे झाल्यावर विकास काय व कसा झाला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संत्रा विदर्भासाठी महत्त्वपूर्ण पीक आहे व या पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी जास्तीत जास्त संशोधन व्हायला हवे असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मुळे शेतकऱ्यांचा फायदा :हंसराज अहीर 

‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मुळे विदर्भातील शेतकऱ्यांना नक्कीच नवी दिशा मिळेल. संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्याला योग्य भावदेखील मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना संत्र्याचे ‘मार्केटिंग’ करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली गेली पाहिजे. संत्र्याला बाजार मिळत नसल्याने भाव मिळत नाही. मात्र ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपुरी संत्र्याला जागतिक पातळीवर ओळख मिळेल, असे अहीर म्हणाले.
प्रत्येक रेल्वे स्थानकात संत्र्याचे ‘स्टॉल्स’ लागावे : विजय दर्डा  

‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’च्या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रोत्साहन दिले. पहिल्या ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपूरचा संत्रा पहिल्यांदाच देशाबाहेर गेला. नागपूरची संत्रानगरी म्हणून ओळख आहे. मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. तसेच देशातील सर्व ठिकाणी नागपुरी संत्र्याची चव चाखता येत नाही. ज्या पद्धतीने ‘नीरा’चे देशभरात ‘स्टॉल’ लागले आहे, त्याप्रकारे आपल्या राज्यातील फळांचे ‘स्टॉल्स’ लागले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होईल. संत्र्याच्या माध्यमातून ’फूड प्रोसेसिंग’वरदेखील भर दिला पाहिजे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर संत्रा व महाराष्ट्रातील फळांचे ‘स्टॉल्स’ लागले पाहिजे, अशी अपेक्षा विजय दर्डा यांनी व्यक्त केली. वर्षभर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे नियोजन व्हावे. यात ‘मार्केटिंग चेन’, संशोधन, उत्पादन यावर मार्गदर्शन व्हावे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले.
‘ऑरेंज इस्टेट्स’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती : मुख्यमंत्री 

विदर्भातील संत्र्याला जगात ओळख मिळावी व संशोधकांना एकत्र आणून संत्र्याचा दर्जा कसा वाढेल, या उद्देशाने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत्र्याला नवीन जीवनदान देण्याचे काम झाले आहे. संत्र्याचे उत्पादन वाढावे यासाठी ‘ऑरेंज इस्टेट्स‘ तयार केल्या पाहिजे. नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात ‘ऑरेंज इस्टेट्स’चा निर्णय घेतला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन, संशोधन इत्यादी आवश्यक बाबी व ‘लॉजिस्टिक्स’ यामाध्यमातून उभ्या करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षी याच ‘ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला निधी उपलब्ध करुन दिला. ‘नोगा’ची हवी तशी प्रगती झालेली नाही.‘नोगा’चा ग्राहक सर्वात मोठा ग्राहक ‘मिलीट्री कॅन्टिन’ होता. मात्र तेथील व्यवस्था बदलल्याने त्यांचा एक मोठा ग्राहक कमी झाला आहे. त्यामुळे ‘नोगा’चा हवा तसा विस्तार झाला नाही. मात्र सरकार पूर्ण मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन’ने ‘पॅक हाऊस’ची मागणी केली. मोर्शी, कारंजा येथे बंद पडलेले ‘पॅक हाऊस’ सुरू झाले आहेत व संत्र्याची निर्यात सुरू होऊ शकली. विदर्भातील संत्रा ‘ग्लोबल’ करण्याची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीनंतर आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांनी १० टक्के फळांचा ‘पल्प’ वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळ मोठी बाजारपेठ उभी झाली आहे. आंतरराष्ट्रीय शीतपेय कंपन्यांनी जास्तीत जास्त फळ विदर्भ, मराठवाड्यातून घेतली आहेत, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संत्र्याचे ‘मार्केटिंग’ व्हावे : एम.एस.लदानिया 

लिंबूवर्गीय फळांमध्ये अनेक औषधी गुण असतात. संत्र्याचे तर अनेक फायदे आहेत. संत्र्याचा वापर वाढावा यासाठी त्याला योग्य प्रसिद्धी व जाहिरात यांच्या माध्यमातून ‘मार्केटिंग’ झाले पाहिजे. नागपूरच्या संत्र्याची चव ही उत्तम आहे. ही चव देश-विदेशात पोहोचविण्यासाठी ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’ फायदेशीर ठरेल, असा विश्वास ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डॉ.एम.एस.लदानिया यांनी व्यक्त केला.
संत्र्याला जागतिक पातळीवर नेणार : कौशिक 

ब्राझील संत्र्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे. मात्र खाण्यासाठी ते ताजे संत्रे विदेशातून आयात करतात. चव व सुगंधाच्या बाबतीत नागपूरचा संत्रा सर्वात चांगला आहे. त्याला जागतिक पातळीवर नेण्याची गरज आहे. ‘यूपीएल’ने पाच मोठ्या ‘पॅक हाऊसेस’सोबत करार केला आहे. संत्रा दूरपर्यंत पोहोचावा या हिशेबाने ‘पॅकिंग’ झाले पाहिजे. केळ व सफरचंद ज्याप्रमाणे देशातील सर्व भागात मिळतात, त्याचप्रमाणे नागपूरचा संत्रादेखील देशविदेशात उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘यूपीएल’ समूह ५० हजार शेतकऱ्यांशी जुळला आहे, अशी माहिती ‘यूपीएल’चे अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर व इंडस्ट्री रिलेशन्स) सागर कौशिक यांनी दिली.
‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक
सर्वच मान्यवरांनी ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. संत्र्याला वैश्विक ओळख निर्माण करुन देण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘लोकमत’ने पाऊल उचलले ही अभिनंदनीय बाब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना संत्र्याबाबत नवीन ज्ञान मिळेल. मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील उत्तम आयोजन झाले आहे. विदर्भ विकासाच्या दिशेने हे आयोजन अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. ‘लोकमत’ने आयोजित केलेला या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूरचा संत्रा जगभरात पोहोचेल, असा विश्वास हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
देशविदेशातील संशोधकांची उपस्थिती
‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’च्या आयोजनाला देशविदेशातील संशोधकांची उपस्थिती होती. यात डॉ.सुएली सिल्व्हा (ब्राझील), डॉ.गिलबर्टो टोझॅट्टी (ब्राझील), डॉ.क्वान सॉंग (साऊथ कोरिया), डॉ.एन.होआ (व्हिएतनाम), डॉ.सिद्दराम्मे गौडा (फ्लोरिडा), डॉ.बालाजी आगलावे (फ्लोरिडा), डॉ.त्शेरिंग पेंजॉर (भूतान), प्रा.केझांग त्शेरिंग (भूतान), डॉ.शांता कार्की (नेपाळ), डॉ.उमेश आचार्य

 

Web Title: Understand world research: Nitin Gadkari appealed to farmers of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.