उद्धव ठाकरे विदर्भात करणार प्रचाराचा शंखनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:50 PM2019-01-17T13:50:30+5:302019-01-17T13:52:18+5:30

शिवसेना व भाजपा यांच्यात युती होणार की नाही याबाबत अद्याप कुठलेही चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र शिवसेनेने विदर्भातील सर्व लोकसभा व विधानसभेच्या जागांसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २ फेब्रुवारी रोजी महारॅली करुन निवडणूक प्रचाराचा शंखनाद करणार आहेत.

Uddhav Thackeray's victory in election campaign in Vidarbha | उद्धव ठाकरे विदर्भात करणार प्रचाराचा शंखनाद

उद्धव ठाकरे विदर्भात करणार प्रचाराचा शंखनाद

Next
ठळक मुद्दे२ फेब्रुवारी रोजी नागपुरात महारॅलीसर्व जागांवर लढण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेना व भाजपा यांच्यात युती होणार की नाही याबाबत अद्याप कुठलेही चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र शिवसेनेने विदर्भातील सर्व लोकसभा व विधानसभेच्या जागांसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २ फेब्रुवारी रोजी महारॅली करुन निवडणूक प्रचाराचा शंखनाद करणार आहेत.
पक्षाच्या निवडणूक तयारीसंदर्भात आयोजित बैठकीनंतर अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पक्षांनी सर्वच जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपा-शिवसेनेच्या युतीबाबत आताच काही बोलता येणार नाही. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षप्रमुखच करतील. भाजपाकडून अद्याप युतीचा कुठलाही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. मात्र भाजपाचे नेते युती होणार असल्याचा दावा करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्ष मजबुतीने निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक झाली. भाजपाशी युती होणार नाही, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येक जागेवर निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे बैठकीत खा.गजानन कीर्तीकर यांनी सांगितले. यावेळी खा.कृपाल तुमाने, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, माजी आमदार आशिष जायस्वाल, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, हितेश यादव चिंटू महाराज, गुड्डू रहांगडले इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Uddhav Thackeray's victory in election campaign in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.