नागपुरात साईबाबांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याला दोन लाख भक्तांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:10 PM2018-01-18T22:10:26+5:302018-01-18T22:16:11+5:30

श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा दर्शन सोहळा वर्धा रोड येथील साई मंदिरात गुरुवारी झाला. या दिवशी विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचे दर्शन घेतले.

Two lacs devotees celebrate the festivals of Saibaba's pedestrians in Nagpur | नागपुरात साईबाबांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याला दोन लाख भक्तांच्या रांगा

नागपुरात साईबाबांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याला दोन लाख भक्तांच्या रांगा

Next
ठळक मुद्देविदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील भक्त साई मंदिरातमंदिराला ४१ वर्षे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचा दर्शन सोहळा वर्धा रोड येथील साई मंदिरात गुरुवारी झाला. या दिवशी विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुकांचे दर्शन घेतले.
सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त, शिर्डी आणि श्री साईबाबा सेवा मंडळाच्या सहयोगाने करण्यात आले. मंडळाचे सचिव अविनाश शेगावकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, साईबाबांच्या ‘चर्म’चरण पादुका मंदिरासाठी एक दिवसाकरिता खास शिर्डीहून मागविण्यात आल्या. सकाळी ६ वाजता काकड आरतीनंतर साईबाबांच्या मूर्तीसमोर भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. भक्तांची अलोट गर्दी पाहता मंदिरात नोंदणी केलेले संपूर्ण विदर्भातील ४२६ कार्यकर्ते भक्तांच्या व्यवस्थेत होते. त्यांना ओळखपत्र आणि भगवी टोपी दिली आणि ड्रेस कोड देण्यात आले. त्यांच्यामुळेच प्रत्येक भक्ताने रांगेतून दर्शन घेतले.
साईबाबांचा समाधी शताब्दी सोहळा
साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबर २०१८ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने शताब्दी महोत्सव १८ आॅक्टोबर २०१७ ते १८ आॅक्टोबर २०१८ यादरम्यान साजरा करण्यात येत आहे. शताब्दी महोत्सवात ‘चर्म’चरण पादुका गुरुवार, १८ जानेवारी २०१८ रोजी मंदिरात येणे, हा भक्तांसाठी योगायोग आहे. त्यामुळे साई मंदिराला शिर्डीचा लूक आला आहे. नागपुरातील मंदिरात ३ डिसेंबर १९७९ ला साईबाबांची मूर्ती स्थापन करण्यात आली. शिर्डी आणि नागपूरची मूर्ती हरीश तालीम या मूर्तिकाराने तयार केली आहे. हा साईभक्तांसाठी योगायोग आहे.
शिर्डी येथील पुजारी गाभाऱ्यात
‘चर्म’चरण पादुका मंदिरात ठेवल्यानंतर गाभाऱ्याचा ताबा शिर्डी येथील मुख्य पुजारी दिलीप सुलाखे आणि मनोहर पाठक यांनी घेतला. याशिवाय सुरक्षेसाठी शिर्डी येथील सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ‘चर्म’चरण पादुका काचेच्या पेटीत ठेवण्यात आल्या आहेत. भक्तांनी पेटीला हात लावून दर्शन घेतले. भक्तांना प्रसाद वाटपासाठी दोन लाख बुंदीचे पॅकेट तयार करण्यात आले; शिवाय भक्तांनी बाबांना अर्पण केलेला प्रसादही भक्तांना वाटप करण्यात आला.
सोन्याच्या ताटात बाबांचा नैवेद्य
भक्ताने भेट दिलेल्या जवळपास ३३ लाख रुपये किमतीच्या एक किलो सोन्याच्या ताटात सकाळी पहिल्यांदा सार्इंना नैवेद्य दाखविण्यात आला. गुरुपौर्णिमेपासून भक्तांनी सोन्याच्या दोन वाट्या (७० ग्रॅम), एक ग्लास (९० ग्रॅम), एक ताम्हणपत्र (९० ग्रॅम), एक रुद्राक्ष सोन्याची माळ (३५० ग्रॅम), सोन्याचा लोटा (३५० ग्रॅम) भेट दिल्या आहेत.

Web Title: Two lacs devotees celebrate the festivals of Saibaba's pedestrians in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.