बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 11:41 AM2018-12-21T11:41:22+5:302018-12-21T13:08:39+5:30

गोंदियामध्ये मादी बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याप्रकरणी वनविभागाने आता दोन आरोपींना अटक केली आहे.

Two accused have been arrested by forest department for hunting a leopard | बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने केली अटक

बिबट्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपींना वनविभागाने केली अटक

Next
ठळक मुद्देगोंदियामध्ये मादी बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याप्रकरणी वनविभागाने आता दोन आरोपींना अटक केली आहे. हेमराज मेश्राम आणि भीमसेन डोंगरवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

गोंदिया - गोंदियामध्ये मादी बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याप्रकरणी वनविभागाने आता दोन आरोपींना अटक केली आहे. हेमराज मेश्राम आणि भीमसेन डोंगरवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना 27 डिसेंबरपर्यंत वनकोठडी मंजूर करण्यात आली आहे.

केळवद शिवारात ही घटना घडली असून गोठनगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी सापडला होता. दोन गोळ्या झाडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात बिबट्याला दोन गोळ्या घालण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. तसेच शिकार केल्यानंतर पंजे आणि नखे कापून नेण्यात आले होते. बिबट्याच्या शिकाऱ्यां ना अटक करण्याचे मोठे आवाहन वन विभागासमोर होते. वनविभागातर्फे यादृष्टीने कसोशीने प्रयत्न करण्यात आले. रविवार व सोमवारी दोन्ही दिवस वनविभागाच्या पिटर नामक श्वानाने नजीकच्या परिसर पिंजून काढला. मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र वनविभागाने प्रयत्न सोडले नाही. सुरबन येथील हेमराज मेश्राम व भिमसेन डोंगरवार यांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. यात आरोपीकडून एअरगन व लोखंडी काता हस्तगत करण्यात आल्याची माहिती प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांनी दिली.


Web Title: Two accused have been arrested by forest department for hunting a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.