क्षयरोग गंभीर परंतु आटोक्यात येणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:05 PM2018-03-23T22:05:35+5:302018-03-23T22:05:49+5:30

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.

Tuberculosis serious but impaired illness | क्षयरोग गंभीर परंतु आटोक्यात येणारा आजार

क्षयरोग गंभीर परंतु आटोक्यात येणारा आजार

Next
ठळक मुद्देअधिष्ठाता निसवाडे : मेडिकलमध्ये जागतिक क्षयरोग दिन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. यासाठी वेळोवेळी त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. शासकीय दृष्टिकोनातून हा आजार शासकीय रुग्णालयांपर्यंतच मर्यादित होता आता खासगी डॉक्टरांनाही यात सामावून घेतल्याने याची व्याप्ती वाढली आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.
मेडिकलच्या रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. माध्यमा चहांदे, रेस्पीरेटरी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम व मेट्रन जोसेफ आदी उपस्थित होते.
डॉ. निसवाडे म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधांपासून ते यंत्रसामूग्री पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करते परंतु त्यांच्यावर उपचार वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर करतात. परिणामी, जबाबदारी निश्चित होत नाही. यात संशोधनालाही वाव राहत नाही. शासनाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
अनिल हिरेखण म्हणाले, गेल्या दक्षकापासून क्षयरोग संपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. परंतु क्षयरोगामुळे होणाऱ्या  मृत्यूंचे प्रमाण अद्यापही लक्षणीय आहे. यामुळे रोगाचा समूळ नाश करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक डॉ. सुशांत मेश्राम यांनी केले. संचालन डॉ. सायली कडमे यांनी केले तर आभार डॉ. नाजीया यांनी मानले. यावेळी पूर्णत: बरे झालेल्या क्षयरोगाच्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. राज गजभिये, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. योगेंद्र बन्सोड, डॉ. वृंदा सहस्त्रभोजने यांच्यासह परशुराम दोरवे आदी उपस्थित होते.
क्षयरोगाने दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यू
डॉ. सुशांत मेश्राम यांनी आपल्या प्रास्तविकात म्हटले की, देशात क्षयरोगाचे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. यात दरवर्षी ७ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे, या रोगामुळे साधारण ३ लाख मुलांना शाळा सोडावी लागते. कर्तापुरुष क्षयरोगाला बळी पडत असल्याने दरवर्षी १ लाख महिला विधवा होतात. क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकत असताना ही आकडेवारी भयावह आहे. यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राने यात पुढाकार घेऊन क्षयरोगाशी लढा देणे आवश्यक आहे.

 

Web Title: Tuberculosis serious but impaired illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.