The truck crushed two persons on the motorcycle at Parshiwani-Saoner road in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी - सावनेर मार्गावर ट्रकने मोटरसायकलवरील दोघांना चिरडले

ठळक मुद्देनववर्षाच्या पार्टीने केला घातमृत जीवलग मित्र : निंबा शिवारातील घटना

आॅनलाईन लोकमत
नागपूर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी - सावनेर मार्गावरील निंबा शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
राजेंद्र रामाजी वाहाने (४५, रा. चिचोली) व फुलसिंग सांडिले (५०, रा. कोथुळणा, ता. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. राजेंद्र व फुलसिंग हे मित्र असून,ते दोघेही निंबा येथे त्यांचा मित्र मंगेश मेश्राम यांच्याकडे नववर्षानिमित्त आले होते. राजेंद्र वाहाने हे फुलसिंग यांना कोथुळणा येथे घरी पाहोचून देण्यासाठी एमएच-४०/एडब्ल्यू-४५०५ क्रमांकाच्या मोटरसायकलने निंब्याहून निघाले. ते दोघेही गावापासून काही अंतरावर जाताच सावनेरहून पारशिवनी मार्गे रामटेककडे भरधाव जाणाऱ्या  एमपी-०९/एएफ-५२६२ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात होताच ट्रकचालकाने ट्रक सोडून घटनास्थळाहून पळ काढला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय, पारशिवनी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी ट्रकचालाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद डेकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने करीत आहेत.


Web Title: The truck crushed two persons on the motorcycle at Parshiwani-Saoner road in Nagpur district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.