ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:29 PM2018-06-30T23:29:45+5:302018-06-30T23:30:41+5:30

ओएचई तार तुटल्यामुळे (ओव्हर हेड इक्विपमेंट) हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्याची घटना कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजेदरम्यान घडली.

Trains on Howrah-Mumbai route disrupted due to OHE Cable break | ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत

ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत

Next
ठळक मुद्देनागपूर नजीकच्या  कामठीतील घटना : अप लाईनवरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओएचई तार तुटल्यामुळे (ओव्हर हेड इक्विपमेंट) हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्याची घटना कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजेदरम्यान घडली.
कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजता रेल्वेगाड्यांना विद्युत पुरवठा करणारी ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती तातडीने दक्षिण पूर्व रेल्वेच्या नागपूर विभागाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. लगेच तुटलेल्या ओएचई तारेची दुरुस्ती करण्यासाठी सायंकाळी ७.१० वाजता तुमसरवरून टॉवर वॅगन कामठीकडे रवाना करण्यात आली. टॉवर वॅगन पोहोचताच ओएचई तार दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, अप लाईनवरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या. या घटनेमुळे १८४०७ पुरी-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस कन्हानला, १८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस भंडाऱ्याला, १२८०७ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन समता एक्स्प्रेस तुमसरला आणि १२८५५ बिलासपूर-इतवारी इंटरसिटीला गोंदिया येथे रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ओएचई तारेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती.

Web Title: Trains on Howrah-Mumbai route disrupted due to OHE Cable break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.