सतत पाठलाग करून तरुणीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:33 AM2019-02-20T00:33:09+5:302019-02-20T00:33:49+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो.

Torching girl by continuous pursuit | सतत पाठलाग करून तरुणीचा छळ

सतत पाठलाग करून तरुणीचा छळ

Next
ठळक मुद्देसडकछाप मजनूविरुद्ध नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो.
आरोपी सुलतान आणि पीडित तरुणी (वय १९) सक्करदऱ्यातील एकाच वस्तीत राहतात. गेल्या काही दिवसांपासून सुलतान तरुणीच्या मागे लागला आहे. तिला वारंवार भेटण्यासाठी, बोलण्यासाठी तिचा पाठलाग करणे, लहान मुलांच्या हाताने तिला निरोप पाठवणे, घरातून बाहेर पडताच तिचा पाठलाग करणे, असे उपद्व्याप त्याने चालवले आहे. बदनामीच्या धाकाने तरुणीने याबाबत वाच्यता करण्याचे टाळले होते. ती चुपचाप छळ सहन करीत असल्यामुळे आरोपी सुलतान चांगलाच निर्ढावला. सोमवारी सकाळी सदर तरुणी घराबाहेर पडताच त्याने तिचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात गाठून त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिने भेटण्यास, बोलण्यास नकार दिल्याने आरोपी सुलतानने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने आधी पालकांना आणि नंतर सक्करदरा पोलिसांना होत असलेला त्रास सांगितला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून सुलतानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
मुलाचे आर्थिक, शारिरिक शोषण
सदरमध्ये कार्यरत असलेल्या एका दाम्पत्याने बाल कलाकार म्हणून पडद्यावर अभिनयाची संधी देण्याचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलाकडून १७ हजार रुपये हडपले. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध बनविण्याचाही प्रयत्न केल्याची तक्रार त्या तरुणाने सदर पोलिसांकडे नोंदविली आहे. या तक्रारीची पोलीस चौकशी करीत आहेत.
मजुराचा अपघाती मृत्यू
ताराचे बंडल चढविताना घसरून पडल्याने डोमरसिंग हिरालाल वर्मा (वय ४५, रा. श्यामनगर पारडी पुनापूर) नामक मजुराचा करुण अंत झाला. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास खंडेलवाल स्टील कॉर्पोरेशनमध्ये तारांचे बंडल चढवीत, उतरवित असताना वर्माचा पाय घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटल, पारडी येथे नेले. तेथून त्याला मेयोत हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास डॉक्टरांनी वर्माला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, मजुरांना धोक्याचे काम देताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरविली जात नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी मजुरांचे नाहक बळी जातात. वर्माच्या मृत्यूला कुणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Torching girl by continuous pursuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.