पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:31 AM2018-06-07T00:31:42+5:302018-06-07T00:32:15+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना शेतातील पिकांना पीक विमा योजनेचे संरक्षण देतानाच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतातील पिकांचे नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यानी शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.

Toll free number begins for to report crop loss | पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करा

पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करा

Next
ठळक मुद्देविमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना शेतातील पिकांना पीक विमा योजनेचे संरक्षण देतानाच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतातील पिकांचे नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यानी शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बुधवारी घेतला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करण्यासाठी कृषी सहायक तसेच कृषी पर्यवेक्षक यांनी ग्रामस्तरावर शेतकऱ्यांच्या सभा घेऊन पीक संरक्षणाच्या दृष्टीने विमा योजनेची आवश्यकतेबद्दल माहिती देण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, तालुका स्तरावर प्रत्येक शुक्रवारी महसूल विभागामार्फत विशेष बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकºयांना पीक विमा योजनेचे कवच देण्यात संदर्भात माहिती देण्यात यावी. शेतातील वैयक्तिक पिकाचे नुकसान झाले असल्यास त्यांना पीक विमा योजनेचा लाभा मिळण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बाड विमा कंपनीने सहज व सुलभ पध्दतीने नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक निर्माण करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
विम्याच्या संरक्षणासंदर्भात व प्रत्येक पीक निहाय नुकसान भरपाई संदर्भात ग्रामीण भागात माहिती पोहचविण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या सर्व कार्यालयात माहिती फलक लावण्यात यावे. आकाशवाणी, दूरदर्शन, एफएमद्वारे, एसएमएस सेवा आदी माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहितीसाठी शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तसेच महसूल विभागाच्या सर्व कार्यालयात व राष्ट्रीयकृत बँकेसोबत आपले सरकार सेवाकेंद्रात संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील सांख्यिकी अधिकारी बी.एल. तफरे, आयसीआयसीआय लोम्बाड विमा कंपनीचे राज पाठक, एस.एम. कुडमुलवार, के. निमेश, माधव चंद्रिकापुरे, अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक अयुब खान आदी उपस्थित होते.

Web Title: Toll free number begins for to report crop loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.