देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज वाढले, दहा वर्षांत १६ पटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:36 AM2017-11-03T01:36:06+5:302017-11-03T01:36:16+5:30

देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज गेल्या १० वर्षांत तब्बल १६ पटीने वाढले आहे. कर्जवसुलीबाबत उदासीन असणाºया या बँका किती गंभीर आर्थिक संकटात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

Tired loans of 21 government banks increased 16 times in ten years | देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज वाढले, दहा वर्षांत १६ पटींनी वाढ

देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज वाढले, दहा वर्षांत १६ पटींनी वाढ

Next

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज गेल्या १० वर्षांत तब्बल १६ पटीने वाढले आहे. कर्जवसुलीबाबत उदासीन असणाºया या बँका किती गंभीर आर्थिक संकटात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
सरकारी बँकांच्या संकेतस्थळावरून ‘लोकमत’ने घेतलेल्या माहितीनुसार, २००७-२००८ यावर्षी सर्व सरकारी बँकांचे थकीत कर्ज केवळ ३९.०३० कोटी होते ते २०१६-१७मध्ये ते तब्बल ६,४१,००० कोटी रुपयांवर पोहचले आहे. ही वाढ १६ पट आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी बँकांना नवीन भांडवल देण्यासाठी २.११ लाख कोटींची तरतूद केली आहे. तथापि, अशा अकार्यक्षम बँकांना कार्यक्षम बनविण्याऐवजी सरकार त्यांच्या अकार्यक्षमतेसाठी बक्षीस देत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.

२१ सरकारी बँकांचे एकूण थकीत कर्ज
                    (रक्कम कोटी रुपये)
२००७-०८ : 39,030
२००८-०९ : 44,957
२००९-१० : 59,927
२०१०-११ : 74,664
२०११-१२ : 1,17,000
२०१२-१३ : 1,64,461
२०१४-१५ : 2,78,877
२०१५-१६ : 5,39,955
२०१६-१७ : 6,41,000

Web Title: Tired loans of 21 government banks increased 16 times in ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक