नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:02 AM2018-06-02T00:02:08+5:302018-06-02T00:04:07+5:30

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.

Three times in Nagpur, the rainy session has been done | नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

नागपुरात तीनदा झाले आहे पावसाळी विधिमंडळअधिवेशन

Next
ठळक मुद्दे प्रत्येक अधिवेशन महिनाभर चालले : नागपुरातील नेते खूश, काहींना शंका


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. हो नाही म्हणत शेवटी राज्य सरकारने यावर शिक्कामोर्तब केले. पण नागपुरात पावसाळी अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीनदा पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अधिवेशन किमान महिनाभर चालले आहे. या निर्णयावर नागपुरातील बहुतांश नेते खूश आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल. नागपूर कराराचेही पालन होईल, असे नेत्यांचे मत आहे तर काहींनी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडतील, अशी शंका व्यक्त केली आहे.
नागपूर करारांतर्गत महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर नागपुरात विधिमंडळाचे एक अधिवेशन घेण्यास सुरुवात झाली. नागपुरात साधारणत: हिवाळी अधिवेशन होते. १९६१ मध्ये पहिल्यांदा नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी १४ जुलै रोजी अधिवेशन सुरु होऊन ३० आॅगस्टपर्यंत चालले होते. यानंतर १९६६ मध्येही नागपुरात पावसाळी अधिवेशन झाले. त्यावेळी २९ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर पर्यंत अधिवेशन चालले. यानंतर १९७१ मध्ये ६ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबर पर्यंत पावसाळी अधिवेशन झाले होते यानंतर मात्र नागपुरात हिवाळी अधिवेशनच होत गेले.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी नेहमीच कमी राहिला. त्यामुळे हे अधिवेशन नेहमीच विदर्भवाद्यांच्या निशाण्यावर राहिले. सरकार फक्त नावासाठी अधिवेशन घेते, आमदार, मंत्री, अधिकारी फक्त पिकनिकसाठी नागपुरात येतात, अशी टीका व्हायची. आता पावसाळी अधिवेशन होत असल्यामुळे ही तक्रार दूर होईल व किमान एक महिना कामकाज चालेल, अशी अपेक्षा आहे.
हिवाळी अधिवेशनाचे काय ?
नागपूर करारात किमान एक अधिवेशन नागपुरात घेण्याचा उल्लेख आहे. सूत्रांच्या मते पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतल्यावर हिवाळी घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनातच घेतला जाईल.

चर्चेसाठी वेळ मिळणार
पावसाळी अधिवेशन एक महिन्याचे असते. हिवाळी अधिवेशन साधारणत: दोन आठवडे चालते. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्यामुळे विदर्भातील समस्यांना प्राधान्य देण्यासाठी अधिक संधी मिळेल.
आ. कृष्णा खोपडे

सकारात्मक चर्चा व्हावी
 पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे स्वागतच आहे. अधिवेशन किमान एक महिना चालावे. विकासाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा व्हावी. विदर्भातील उद्योग व रोजगारावरही चर्चा व्हावी.
 अनिस अहमद, माजी मंत्री

शेतकऱ्यांपासून पळतेय सरकार
नागपुरात पावसाळी अधिवेशन घेऊन सरकार शेतकºयांच्या प्रश्नांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न समोर येत नाही. ते मोर्चे काढू शकत नाही. आता सरकारने या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे.
 नितीन राऊत, माजी मंत्री

विदर्भाचा फायदाच
 नागपुरात हिवाळी अधिवेशन असो की पावसाळी अधिवेशन, विदर्भाच्या प्रश्नांना सरकारतर्फे प्राधान्य दिले जाते. मुंबईच्या तुलनेत नागपुरात कमी पाऊस पडतो. त्यामुळे लोकांचीही गैरसोय होणार नाही.
आ. सुधाकर देशमुख

Web Title: Three times in Nagpur, the rainy session has been done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.