नागपुरात मिलिटरी स्पेशल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 03:06 PM2018-11-13T15:06:21+5:302018-11-13T15:06:52+5:30

गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला दरम्यान धावत असलेल्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात शिरत असताना गुरुद्वाराजवळ रुळावरून घसरले.

Three coaches of the military special train collapsed in Nagpur | नागपुरात मिलिटरी स्पेशल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले

नागपुरात मिलिटरी स्पेशल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले

Next
ठळक मुद्देकुठलीही वित्त वा जिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला दरम्यान धावत असलेल्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात शिरत असताना गुरुद्वाराजवळ रुळावरून घसरले. या अपघातात कुठलीही वित्त वा जिवीतहानी झालेली नाही.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या डी केबिनजवळ ही गाडी येत असतानाच अचानक गाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. या गाडीत मिलिटरीचे बरेच सामान व काही जवान प्रवास करीत होते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून गाडीचे डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही गाडी कुठल्या प्रवासी गाड्यांच्या रेल्वेमार्गावर नसल्याने प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक अबाधित राहिले आहे.

Web Title: Three coaches of the military special train collapsed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.