नागपुरात पीएचडी गाईडकडूनच महिलेचा विनयभंग करून धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:23 PM2017-12-30T14:23:42+5:302017-12-30T14:25:28+5:30

संशोधन (पीएचडी) करणाऱ्या एका महिलेशी (वय ३६) वारंवार लज्जास्पद वर्तन करणाऱ्या खुशाल मेले नामक मार्गदर्शक (गाईड) आणि त्याच्या सहकारी महिलेवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीड वर्षांपूर्वीच्या या गैरप्रकाराच्या तक्रार अर्जाची दीर्घ चौकशी  केल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

Threat by molestation of woman by Ph.D. guide in Nagpur | नागपुरात पीएचडी गाईडकडूनच महिलेचा विनयभंग करून धमकी

नागपुरात पीएचडी गाईडकडूनच महिलेचा विनयभंग करून धमकी

Next
ठळक मुद्देदीड वर्षांपूर्वीचा प्रकार : गणेशपेठेत गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
नागपूर : संशोधन (पीएचडी) करणाऱ्या एका महिलेशी (वय ३६) वारंवार लज्जास्पद वर्तन करणाऱ्या खुशाल मेले नामक मार्गदर्शक (गाईड) आणि त्याच्या सहकारी महिलेवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीड वर्षांपूर्वीच्या या गैरप्रकाराच्या तक्रार अर्जाची दीर्घ चौकशी  केल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २ आॅगस्ट ते २९ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत ती पीएचडीसाठी खुशाल मेले यांच्याकडे मार्गदर्शन घेत होती. या कालावधीत मेले यांनी तिच्यासोबत अनेकदा लज्जास्पद वर्तन केले. या प्रकाराची माहिती आरोपी मेलेसोबत संबंधित असलेल्या संगीता पाठराबे नामक महिलेला सांगितली. संगीताने तिला दिलासा देण्याऐवजी तिला गप्प राहण्यास सांगितले. तू या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे केल्यास तुझ्यावर गँगरेप करवून घेऊ, अशी धमकी दिल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी या प्रकरणी मेले आणि पाठराबेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोघांची चौकशी केली जात आहे.

Web Title: Threat by molestation of woman by Ph.D. guide in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.