हजारो कर्मचाऱ्यांना मिळालेच नाही पोस्टल बॅलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:46 AM2019-04-21T00:46:13+5:302019-04-21T00:47:40+5:30

निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी कर्मचाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहे.

Thousands of employees do not get postal ballot | हजारो कर्मचाऱ्यांना मिळालेच नाही पोस्टल बॅलेट

हजारो कर्मचाऱ्यांना मिळालेच नाही पोस्टल बॅलेट

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचारी संघटनांची ओरड : मतदानापासून वंचित राहण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र हजारो कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळालेच नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी कर्मचाऱ्यांचे आरोप फेटाळून लावले आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २२ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यातील १९,८४८ कर्मचाऱ्यांनी पहिल्या दोन प्रशिक्षणाच्या वेळी फार्म १२ भरून पोस्टल बॅलेटची मागणी केली. यात ९५८३ हे नागपूर तर १० हजार २६५ रामटेक लोकसभा मतदार संघातील कर्मचारी होते.
विधानसभानिहाय निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांवर पोस्टल बॅलेट जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही एक दिवस पोस्टल बॅलेट जमा करण्याची व्यवस्था केली होती. मात्र याची प्रसिद्धीच करण्यात आली नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना ते जमा करता आले नाही. अनेक कर्मचाऱ्यांच्या घरी पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याची ओरड कर्मचारी संघटनांकडून होत आहे.
सर्वांनाच पाठवले पोस्टल बॅलेट, ४१९४ अर्ज रद्द
१९,८४८ कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी अर्ज केले. यातील ४१९४ अर्ज चुकीच्या माहितीमुळे रद्द करण्यात आले. नागपूरमधील १४६१ तर रामटेक लोकसभा मतदार संघातील २७३३ अर्ज रद्द झाले. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले. चुकीचा पत्ता असल्याने आतापर्यंत ७१ कर्मचाऱ्यांचे पोस्टल बॅलेट परत आले आहे. ज्यांचे पोस्टल बॅलेट चुकीच्या पत्त्यामुळे परत आले असतील ते नागपूर आणि रामटेक सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत. येथून त्यांना बॅलेट घेऊन जाता येईल. मतमोजणी म्हणजे २३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे पोस्टल बॅलेट जमा करता येईल.
अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर.

Web Title: Thousands of employees do not get postal ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.