आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:08 PM2019-07-08T21:08:51+5:302019-07-08T21:10:07+5:30

काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

There should be new leadership wherever necessary: Ashok Chavan | आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

Next
ठळक मुद्दे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
काँग्रेस अजूनही संपलेली नाही. एकत्रितपणे कार्य करून काँग्रेसला परत शक्तिशाली बनवू. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी दिली पाहिजे. महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबत लवकरच निर्णय होईल. सोबतच पुढील निवडणुकांसह संघटनेच्या कार्याचीदेखील समीक्षा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
भाजप लोकशाहीला खिळखिळी करीत आहे
कर्नाटकमध्ये सद्यस्थितीत जे काही होत आहे, ते अतिशय अयोग्य आहे. भाजपा देशातील लोकशाही व्यवस्थेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे ते त्याचा दुरुपयोग करीत आहे. मात्र जे लोक काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेले आहेत, ते लोक पक्षाला सोडून जाणार नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार राहिले पाहिजे. प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या सरकारला हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कर्नाटकमध्ये तेथील स्थानिक तसेच मुंबईचे नेते सरकार वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: There should be new leadership wherever necessary: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.