धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या  गांधीबाग येथे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:14 AM2018-12-16T00:14:32+5:302018-12-16T00:17:50+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असामाजिक तत्त्वांनी पथकावर दगडफेक केली तर अग्रसेन चौकात जमावाला आवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परंतु विरोधाला न जुमानता पथकाने पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले.

Tension in Gandhigag of Nagpur after removing religious place | धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या  गांधीबाग येथे तणाव

धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या  गांधीबाग येथे तणाव

Next
ठळक मुद्देबगिचाजवळ दगडफेक : अग्रसेन चौकात सौम्य लाठीमार : विरोधाला न जुमानता कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असामाजिक तत्त्वांनी पथकावर दगडफेक केली तर अग्रसेन चौकात जमावाला आवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परंतु विरोधाला न जुमानता पथकाने पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. 


धार्मिक स्थळ हटविण्याला नागरिकांचा विरोध होणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी १०.३० च्या सुमारास गांधीबाग बगिचा समोरील धार्मिक स्थळ हटविण्यासाठी पथक पोहचले. 

Web Title: Tension in Gandhigag of Nagpur after removing religious place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.