एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:53 PM2018-06-21T23:53:01+5:302018-06-21T23:53:13+5:30

संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी देऊनही सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Suspension and termination action of ST employees | एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फीची कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फीची कारवाई

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये असंतोष : नागपूर प्रदेशातील ३५ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी देऊनही सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जूनला स्वयंस्फूर्तीने संप पुकारला होता. संपात ९० हजार कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी कर्मचारी माघार घेत नसल्याचे पाहून परिवहन मंत्र्यांनी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या. परंतु सहा महिन्यापेक्षा कमी काळ सेवा झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विचार न करता प्रशासनाकडून त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
कर्मचारी संतापले
कर्मचाऱ्यांवर करण्यात येत असलेल्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असून, अशी हुकूमशाही खपवून घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास त्यांच्या भावनांचा उद्रेक होणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यात कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरही प्रशासनाचा कानाडोळा आहे. संपकाळात प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याच्या कारणावरून नागपूर विभागातील चौघांना दोषारोपपत्र देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असून, राजुरा आगारातील महेंद्र ढोबे हे आजारपणामुळे सुटीवर असूनही त्यांना सेवा समाप्तीचा आदेश देण्यात आला आहे.

नागपूर प्रदेशातील कारवाई
नागपूर ३ बडतर्फ
काटोल ३ बडतर्फ
चंद्रपूर ३ निलंबित
अहेरी २ निलंबित
राजुरा ९ बडतर्फ, ७ निलंबित
तळेगाव ३ बडतर्फ
ब्रह्मपुरी २ निलंबित
 

Web Title: Suspension and termination action of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.