नागपुरातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 08:25 PM2018-07-19T20:25:36+5:302018-07-19T20:27:36+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचानक वीज खंडित झाल्याने डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. मेडिकलच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाच्या या गलथानपणामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Surgery in Torchlight at the Trauma Care Center in Nagpur | नागपुरातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया

नागपुरातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्दे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचानक वीज खंडित झाल्याने डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. मेडिकलच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाच्या या गलथानपणामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, लोकलेखा समितीने ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली असताना ही घटना घडली. परंतु त्यांच्यापासून हा घटना लपवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोई मिळाव्यात या दृष्टीने मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. दोन वर्षांपासून हे सेंटर रुग्ण सेवेत आहे. परंतु येथील त्रुटींना घेऊन हे सेंटर नेहमीच चर्चेत राहिले आहे. याला घेऊनच मे २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीने पाहणी केली. यात विना कॅज्युअल्टी शिवाय ट्रॉमा केअर सेंटर सुरू असल्यावर आश्चर्य व्यक्त केले. त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने कॅज्युअल्टीला सुरुवात झाली. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अद्ययावत सोयी उपलब्ध असताना मात्र त्याचा फायदा होत नसल्याचेही चित्र आहे. लाखो रुपये खर्चून जनरेटरची व्यवस्था केली असताना बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने शस्त्रक्रिया गृहाशी त्याची जोडणीच केली नाही. यामुळे वीज खंडित झाल्यास शस्त्रक्रियांना फटका बसतो.
सूत्रानुसार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी सोमवार १६ जुलै रोजी ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही समिती ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाय ठेवत नाही तोच वीजपुरवठा खंडित झाला. जनरेटर सुरू झाले, परंतु शस्त्रक्रियागृह अंधारात बुडाले. डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया सुरू ठेवली. या प्रकाराच्या माहितीपासून लोकलेखा समितीला दूर ठेवण्यात आले. यामुळे याची फारशी चर्चा झाली नाही.

Web Title: Surgery in Torchlight at the Trauma Care Center in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.