Superstar Jitendra today in Nagpur | सुपरस्टार जितेंद्र आज नागपुरात
सुपरस्टार जितेंद्र आज नागपुरात

ठळक मुद्देचाहत्यांची इच्छा पूर्ण : लोकमत सखी मंचचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपरस्टार अभिनेता जितेंद्रला भेटण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लोकमत सखी मंचच्या सहकार्याने शनिवारी आयोजित संगीत, नृत्य व श्रवणीय गीतांनी भरलेल्या कार्यक्रमात जितेंद्र सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जितेंद्रची ताल धरायला लावणारी गिते सादर केली जाणार आहेत.
स्वयंदीप संस्थेच्यावतीने मानकापूर क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला सायंकाळी ६ वाजता सुरुवात होईल. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. भावना डाबरे-राज यांची आहे. कार्यक्रमात मो. रफी यांना आदर्श मानणारे प्रसिद्ध पार्श्वगायक शब्बीरकुमार व इतर गायक जितेंद्रच्या गीत गाया पत्थरोने, कारवा इत्यादी गाजलेल्या चित्रपटांतील गाणी सादर करणार आहेत. इतर गायकांमध्ये राजेश अय्यर, वैभव वशिष्ठ व निरुपमा डे यांचा समावेश आहे. या प्रत्येक गायकाचा आवाज श्रोत्यांना वेड लावणारा आहे. त्यांच्यासोबत मुंबईतील प्रसिद्ध डान्स ग्रुप व श्याम जावडा यांचा २० कलावंतांचा वाद्यवृंद समूह प्रस्तुती देणार आहे.

 


Web Title: Superstar Jitendra today in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.