बस खरेदीसाठी सल्लागाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:24 AM2018-03-14T00:24:21+5:302018-03-14T00:27:40+5:30

प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट घातला आहे. यासाठी सात लाखांचा खर्च करण्याची तयारी विभागाने केली आहे.

Sullanger's appointment to buy bus | बस खरेदीसाठी सल्लागाराची नियुक्ती

बस खरेदीसाठी सल्लागाराची नियुक्ती

Next
ठळक मुद्देनागपूर मनपाच्या परिवहन विभागाचा अजब कारभार : तोटा असूनही पैशाची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट घातला आहे. यासाठी सात लाखांचा खर्च करण्याची तयारी विभागाने केली आहे.
वास्तविक महापालिके च्या परिवहन विभागातील अधिकारी वा बस आॅपरेटरवर नियंत्रण ठेवाऱ्या आयबीटीएम आॅपरेटर करू शकतो. केवळ बसेस खरेदी करण्याच्या प्रक्रियेसाठी सात लाख खर्च करण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यातील विविध शहरात महिलांसाठी विशेष बसेस असाव्या. यासाठी तेजस्विनी योजनेंतर्गत महापालिकेला ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून सुरुवातील डिझेल बसेस खरेदी करावयाच्या होत्या. परंतु पर्यावरणाचा विचार करता इलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सात महिन्यात बसेस खरेदी करण्यात आलेल्या नाही. यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. मात्र सल्लागारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी चालविली आहे.
महिन्याकाठी तीन कोटींचा तोटा
शहर बससेवा चालविण्यासाठी महापालिकेने तीन नवीन आॅपरेटर नेमले आहेत़ मात्र, परिवहन सेवेत सुधार होण्याऐवजी ती डबघाईस येत आहे़ कोट्यवधीचा तोटा महापालिकेला सहन करावा लागत आहे़ प्रत्येक महिन्याला तीन ते साडेतीन कोटींचा बोजा सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७ या काळात महापालिकेला शहर बसच्या माध्यमातून ४८ कोटी ९४ लाख ८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले तर, ११० कोटी ६१ लाख ४९ हजार रुपये महापालिकेला बिलापोटी द्यावे लागले.
चार महिन्यातील ताळेबंद
आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ पर्यंंत तिकिट विक्रीतून १९ कोटी ५ लाख ७६ हजार ३६३ रुपये तिजोरीत आले़ ३१ कोटी १४ लाख ४७ हजार ४९९ रुपये इतका खर्च झाला़ जानेवारी २०१८ या महिन्यात ६ कोटी ५७ लाख १० हजार ४७० रुपये इतका महसूल तिकीट विक्रीच्या माध्यमातून गोळा झाला़ ८ कोटी ७० लाख ७ हजार २९१ इतका खर्च झाला़ शुक्रवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत या खर्चाचा लेखाजोखा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे़

Web Title: Sullanger's appointment to buy bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.