आरटीईअंतर्गत प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 08:24 PM2019-06-13T20:24:37+5:302019-06-13T20:25:26+5:30

आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.

The students who are denied admission under RTE will get justice | आरटीईअंतर्गत प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

आरटीईअंतर्गत प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

Next
ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात मिळणार प्रवेश : चुकीच्या मॅपिंगमुळे प्रवेशात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.
आरटीईच्या पहिल्या टप्प्यात ज्या बालकांची निवड झाली होती. त्यातील काही बालकांचे प्रवेश रद्द करण्यात आले होते. नियमानुसार त्यांच्या घराचे अंतर शाळेपासून एक ते तीन किलोमीटरच्या परिघात येत नाही. नागपूरच नाही तर संपूर्ण राज्यात या अडचणी आल्या होत्या. यासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे मो. शाहीद शरीफ यांनी यासंदर्भात राज्य शासनाला पत्र लिहिले. यात उल्लेख केला की चुकीच्या गुगल मॅपिंगमुळे बालक पात्र असूनही त्याला आरटीईचा लाभ मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास करून गरीब व वंचित वर्गाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची त्यांनी मागणी केली. शाहीद शरीफ यांच्या पत्राची शिक्षण विभागाने दखल घेतली.
शाहीद शरीफ यांनी एनसीपीसीआरलासुद्धा पत्र लिहिले होते. एनसीपीसीआरचे वरिष्ठ समन्वयक रमन गौर यांनी याप्रकरणी राज्य शासनाला पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर लगेच दखल घेतली.

दुसºया टप्प्याच्या प्रक्रियेला उशीर
आरटीईच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया १० मे ला संपली. लगेच दुसरी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र एक महिना झाल्यानंतरही प्रक्रिया सुरू झाली नाही. प्रक्रियेच्या नावावर अर्जामध्ये सुधार करण्याची संधी पालकांना दिली आहे. शिवाय ज्या मुलांचे आॅनलाईन अर्ज काही कारणास्तव जमा झाले नव्हते. त्यांना पुन्हा अर्ज जमा करण्याची संधी देण्यात आली आहे. लवकरच दुसरा ड्रॉ काढण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

३९०४ जागेवर झाले प्रवेश
६७५ शाळांमध्ये आरटीईच्या ७२०४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी २६००० बालकांचे आॅनलाईन अर्ज आले होते. पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या लॉटरीमध्ये ५७०१ बालकांची निवड करण्यात आली होती. १० मेपर्यंत ३९०४ मुलांनी प्रवेश घेतले होते.

 

Web Title: The students who are denied admission under RTE will get justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.