विद्यार्थ्यांनी सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी : परिणय फुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:05 AM2019-07-13T00:05:40+5:302019-07-13T00:06:59+5:30

आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

Students should run mess on co-operative basis: Parinay Fuke | विद्यार्थ्यांनी सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी : परिणय फुके

विद्यार्थ्यांनी सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी : परिणय फुके

Next
ठळक मुद्दे पारडी व हिवरीनगर येथील वसतिगृहांची केली पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
आदिवासी मुलांचे पारडी येथील शासकीय वसतिगृह तसेच हिवरीनगर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. आदिवासी मुलांचे तसेच मुलींच्या शासकीय वसतिगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा हा सुमार असल्याबाबतच्या तक्रारी आदिवासी विभागाकडे येत होत्या. यासंदर्भात शासनाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) योजनेव्दारे खानावळीसाठी दर महिन्याला ३ हजार ५०० रुपये जमा होतात. या रकमेतून विद्यार्थी हव्या असलेल्या खानावळीतून डबा मागवतात. परंतू ज्यादा शुल्क अदा करुन देखील खाद्यपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट राहते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्रायोगिक तत्त्वावर केवळ एक महिन्यासाठी सहकारी खानावळ चालवावी. यामध्ये गृहप्रमुख, गृहपाल यांच्या देखरेखीखाली आदिवासी वसतिगृहामध्ये खानावळ चालविण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी जाहिरात काढण्यात यावी. या अंतर्गत खानावळीत स्वच्छता आणि दर्जा कायम राखून विद्यार्थ्यांना योग्य आहार पुरविणाऱ्या खानावळी चालकाची नेमणूक करावी. अन्न पदार्थ गृहप्रमुख, गृहपाल तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीमध्ये वसतिगृहाच्या स्वयंपाक घरामध्ये बनविण्यात येतील. या योगे विद्यार्थ्यांना ताजे आणि उत्तम खाद्यपदार्थ वेळेवर उपलब्ध होतील, असेही फुके यांनी सांगितले.
इंटरनेट सुविधा मिळणार
 विद्यार्थिर्नींनी ग्रंथालयामध्ये असणाºया संगणकांसाठी इंटरनेटच्या सुविधेची मागणी केली. विद्यार्थिनींची ही मागणी पूर्ण करण्यासंदर्भात डॉ. फुके यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल शीतल मानकर यांना सूचना दिल्यात.
प्रवेश प्रक्रीया सुरु
 आदिवासी मुलांच्या वसतीगृहामध्ये एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता असून सध्यस्थितीला नवीन ८१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी वसतीगृहात राहत आहेत. आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये १०० विद्यार्थिनींची क्षमता असून सध्यस्थितीला ३६ विद्यार्थिनी वसतीगृहात राहत असून नवीन विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे.

Web Title: Students should run mess on co-operative basis: Parinay Fuke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.