नागपुरात  अडीच महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:09 AM2019-05-23T00:09:42+5:302019-05-23T00:10:21+5:30

नागपूर शहरात ९० हजार बेवारस श्वान असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी महापालिकेने नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी करण्यात आली.

Sterilization of 1141 dogs in Nagpur at month two and a half | नागपुरात  अडीच महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी

नागपुरात  अडीच महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी

Next
ठळक मुद्देगती वाढविण्याची गरज : तरच शहरातील नागरिकांना मिळेल दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात ९० हजार बेवारस श्वान असून, त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोकाट श्वानांनी चावा घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने याला आळा घालण्यासाठी महापालिकेने नसबंदी शस्त्रक्रिया मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी करण्यात आली.
महाराज बाग समोरील पशुसंवर्धन विभागाच्या पशु रुग्णालयात नसबंदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नसबंदीची जबाबदारी व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल्स रिकगनाईज बाय अ‍ॅनिमल या संस्थेकडे सोपविली आहे. दररोज १५ ते २० श्वानांवर नसबंदी होत आहे. १४ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या अडीच महिन्यात ११४१ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. फेबु्रवारी महिन्यात २२३, मार्चमध्ये ५३३ तर एप्रिल महिन्यात ५८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र शहरातील मोकाट श्वानांची संख्या विचारात घेता याची गती वाढविण्याची गरज आहे.
पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही मोकाट डुकरे व श्वानाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्यानुसार डुकरे पकडण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तसेच शहरातील मोकाट श्वानांवर नसबंदी केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन परिसर, बसस्थानक, विमानतळ व बाजार भागातील श्वानांवर लक्ष केंद्रित करण्यात असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
‘डॉग रुल २००१’नुसार मोकाट श्वानांना पकडून दुसरीकडे सोडता येत नाही. त्यामुळे मोकाट श्वानांना आळा घालण्यासाठी नसबंदी व उपचार हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. २००१ चा मोकाट श्वानांबाबतचा कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मोकाट श्वानांना पकडून दुसरीकडे नेता येत नाही. तसेच पशुप्रेमी कायद्याचा आधार घेत श्वानांना पकडण्याला विरोध दर्शवितात. दुसरीकडे सक्षम यंत्रणा नव्हती. यामुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग हतबल असल्याचे चित्र मागील काही वर्षांत निर्माण झाले होते. नसबंदी मोहिमेमुळे मोकाट श्वानांना काही प्रमाणात आळा बसण्याला मदत झाली आहे.

Web Title: Sterilization of 1141 dogs in Nagpur at month two and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.