राज्याचे नवे वाळू धोरण लवकरच; चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 08:53 PM2017-12-20T20:53:49+5:302017-12-20T20:54:18+5:30

राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.

State's new sand policy soon; Chandrakant Patil | राज्याचे नवे वाळू धोरण लवकरच; चंद्रकांत पाटील

राज्याचे नवे वाळू धोरण लवकरच; चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देनागपुरातील ‘इनर रिंग रोड’च्या कामासाठी स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलातून कपात

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली.
आमदार अमर काळे, विजय वडेट्टीवार, रणजित कांबळे, प्रा. वीरेंद्र जगताप, अ‍ॅड. यशोमती ठाकूर आदींनी या नागपुरातील इनर रिंग रोडसंबंधीच्या स्वामित्व धनासंबंधी लक्षवेधी सूचना सादर केली होती. त्यावर उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांच्या कामासाठी वापरलेल्या गौण खनिजाच्या वापरासाठीचे स्वामित्व धन संबंधित कंत्राटदारांनी भरले की नाही याची खात्री करुनच त्यांना अंतिम बिल दिले जाते. नागपुरातील इनर रिंग रोडची सुधारणा करण्याचे काम प्रगतिपथावर असून हे काम करणाºया कंत्राटदारास प्रदान करण्यात आलेल्या देयकांमधून गौण खनिजासाठीच्या स्वामित्व धनाच्या फरकाच्या अनुषंगाने ५८.४७ लाख रुपये इतक्या रकमेची कपात करण्यात आली असल्याचीही माहिती त्यांनीदिली.
नागपूर शहरातील अंतर्गत वळणमागार्ची सुधारणा करण्याचे काम आर. पी. एस. इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्याकडे आहे. या कामाची किंमत २०४.५२ कोटी रुपये इतकी आहे. सध्या ११५ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून कंत्राटदारास ७९.४९ कोटी रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे. या कामामध्ये वापरण्यात आलेल्या ८१ हजार १२४ ब्रास खनिजावर देय स्वामित्व धन हे एकूण कोटी २४ लाख रुपये असून ते शासनास अदा केल्याबाबतचे ट्रान्झिट पास कंत्राटदाराने सादर करणे आवश्यक आहे. तथापि, कंत्राटदाराने ६९ हजार ९५५ ब्रास खनिजाच्या स्वामित्व धनाच्या २ कोटी ८० लाख रुपयांच्या पावत्या (ट्रान्झिट पास) सादर केल्या आहेत. ११ हजार १६९ ब्रास खनिजाच्या ४४.६७ लाख रुपयांच्या पावत्या सादर केलेल्या नाहीत. त्यामुळे कंत्राटदारास प्रदान करण्यात आलेल्या देयकांमधून स्वामित्व धनाच्या फरकाच्या अनुषंगाने ५८.४७ लाख रुपये इतक्या रकमेची कपात करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: State's new sand policy soon; Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.