राज्यात आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 08:04 PM2017-12-18T20:04:26+5:302017-12-18T20:05:01+5:30

राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

The state seized a gutkha worth Rs one crore so far | राज्यात आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त

राज्यात आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांची माहिती

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात छुप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
यासंदर्भात डॉ. संतोष टारफे, निर्मला गावित, कुणाल पाटील, अमीन पटेल, डी. पी. सावंत, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य सदस्यांनी मुंबईसह राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बापट यांनी म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात कारवाई केली जाते.
सी.बी. कंट्रोल आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून, ३ आॅक्टोबर २०१७ रोजी २८ लाख ८७ हजार १५० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर ४ आॅक्टोबर व १० आॅक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अनुक्रमे १२ लाख ६५ हजार आणि ९ लाख ३१ हजार ४६० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या लातूर कार्यालयाने २७ आॅक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत ४२ लाख १२ हजारांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे १० लाख रुपये किमतीचा परराज्यातून विक्रीस येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे सुमारे एक कोटी दोन लाख ९६ हजार २१० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Web Title: The state seized a gutkha worth Rs one crore so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.