राज्य खड्डेमुक्त करणार - परिणय फुके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:40 AM2019-06-24T06:40:05+5:302019-06-24T06:40:22+5:30

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवरील खड्ड्यांचे प्रमाण शासनाच्या प्रयत्नांमुळे कमी झाले आहे.

 State patch-free - Convulsions | राज्य खड्डेमुक्त करणार - परिणय फुके

राज्य खड्डेमुक्त करणार - परिणय फुके

Next

नागपूर : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवरील खड्ड्यांचे प्रमाण शासनाच्या प्रयत्नांमुळे कमी झाले आहे. येत्या काळात याला आणखी गती देण्यात येईल व राज्याला खड्डेमुक्त करण्यात येईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम, वन, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नागपूरला आल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
सबकुछ आॅनलाइनच्या जमान्यात जनतेला खड्ड्यांसंदर्भात थेट मोबाइलवरून तक्रार करता यावी यासाठी ‘अ‍ॅप’ तयार करण्यात येणार आहे. याअंतर्गत तक्रार आल्यावर ४८ तासांच्या आत खड्डे बुजविण्यात येतील, अशी योजना आहे, असे फुके यांनी सांगितले. रस्ते बांधकामात खराब दर्जा खपवून घेतला जाणार
नाही. सिमेंट रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यास कारवाई करण्यात
येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. पुढील तीन महिन्यांत सरकारचे
उपक्रम व योजना जास्तीत जास्त प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. जर विधानसभा निवडणूक
लढायची झालीच तर मी भंडारा गोंदियातून लढवेन. मात्र
निवडणूक लढण्यासंदर्भात सर्व निर्णय पक्षच घेईल, असे फुके यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’त आणणार
राज्यात विविध आश्रमशाळा, वसतिगृहे, शाळा इत्यादी ठिकाणी राहणाºया व शिकणाºया आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या साडेपाच लाखांहून अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना विविध सवलती मिळतात. या विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’मध्ये आणण्यात येणार असून त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल. सोबतच या सर्व विद्यार्थ्यांचा विमादेखील काढण्यात येणार आहे, अशी माहिती परिणय फुके यांनी दिली.
राज्यातील एकाही आश्रमशाळेतील मुलगा खाली झोपणार नाही, खाली बसून शिक्षण घेणार नाही. सर्व ठिकाणी नवीन फर्निचरसाठी निविदी प्रक्रियादेखील राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

‘प्रशासनाला वठणीवर आणणार’

प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही. यासंदर्भात फुके यांना विचारणा केली असता प्रशासनाला वठणीवर आणण्यात येईल व कामाचा वेग वाढविण्यावर भर असेल, असे प्रतिपादन केले.

Web Title:  State patch-free - Convulsions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.