नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 09:13 PM2018-01-13T21:13:56+5:302018-01-13T21:14:51+5:30

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या २८ जानेवारीपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ८ विभागातील ३२ संघ आणि ४४८ खेळाडू सहभागी होणार आहेत.

State-level volleyball tournament in Nagpur from 28th | नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २८ पासून

नागपुरात राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा २८ पासून

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी चषक : ३२ संघ व ४४८ खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा येत्या २८ जानेवारीपासून विभागीय क्रीडा संकुलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये ८ विभागातील ३२ संघ आणि ४४८ खेळाडू सहभागी होणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश शहारे, जिल्हा संघटक सुनील हांडे, महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळाचे डॉ. गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, समितीचे निमंत्रित सदस्य यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेच्या आयोजनासोबतच खेळाडूंच्या  निवास-भोजनाची व्यवस्था तसेच क्रीडांगणावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी व्यवस्थित नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असला तरी, राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तेव्हा उद्योजक, विविध संस्था तसेच सीएसआर निधी मिळण्याबाबत आवाहन करण्यात येईल, तसेच या स्पर्धांना प्रायोजकत्व मिळवून निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: State-level volleyball tournament in Nagpur from 28th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.