भरधाव वाहनाची धडक : बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:47 AM2019-02-16T00:47:43+5:302019-02-16T00:48:25+5:30

भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. निखिल गजानन गुरभेले (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दिघोरी नाक्याजवळ, राऊतनगरात राहत होता.

Speedy vehicle dashed : Student dead | भरधाव वाहनाची धडक : बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत

भरधाव वाहनाची धडक : बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत

Next
ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. निखिल गजानन गुरभेले (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दिघोरी नाक्याजवळ, राऊतनगरात राहत होता. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास निखिल त्याच्या मोटरसायकलने म्हाळगीनगर चौकातून पिपळा फाट्याकडे जात होता. हुडकेश्वरमधील नासरे सभागृहाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे निखिल खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Speedy vehicle dashed : Student dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.