दिवंगत संपत रामटेके यांना स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:15 AM2017-11-18T11:15:50+5:302017-11-18T11:17:41+5:30

सिकलसेल प्रतिबंधासाठी आणि सिकलसेल रुग्णांना आरोग्य सेवेसाठी सातत्याने गेली २६ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजसेवी दिवंगत संपत रामटेके यांना यंदाचा स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Smita-Smruti Award for late Sampat Ramteke | दिवंगत संपत रामटेके यांना स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर

दिवंगत संपत रामटेके यांना स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर

Next
ठळक मुद्देरंगभूमीसाठी वीरेेंद्र गणवीर यांना पुरस्कार १६ डिसेंबरला पुरस्कार वितरणसिकलसेलसाठी रामटेके यांचे आयुष्य वाहिलेले

आॅनलाईन लोकमत
नागपूर : सिकलसेल प्रतिबंधासाठी आणि सिकलसेल रुग्णांना आरोग्य सेवेसाठी सातत्याने गेली २६ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजसेवी दिवंगत संपत रामटेके यांना यंदाचा स्मिता-स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीसाठी वीरेंद्र गणवीर यांनासुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूरच्यावतीने दरवर्षी प्रतिभासंपन्न अभिनेत्री दिवंगत स्मिता पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक आणि रंगभूमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया विदर्भातील प्रत्येकी एक व्यक्तीला रोख रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे स्वरुप असलेला स्मिता-स्मृती पुरस्कार देऊन गौरविले जाते. या वर्षी रंगभूमीच्या क्षेत्रात बालनाट्य, पथनाट्य, एकांकिका आणि महानाट्यातून आपली मुद्रा उमटविणारे नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता वीरेंद्र गणवीर (रंगभूमी)यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी संपत रामटेके यांची निवड एकमताने करण्यात आली होती. संपत रामटेके हे सिकलसेल प्रतिबंधासाठी आणि सिकलसेल रुग्णाना आरोग्य सेवा मिळावी म्हणून शेवटपर्यंत झटत राहिले. गुरुवारी त्यांचे निधन झाले. स्मिता-स्मृती हा पुरस्कार दिवंगतांना दिला जात नसला तरी संपत रामटेके यांनी निवड आधीच झाली होती. तशा आशयाचे पत्र त्यांना पाठविण्यात आले होते व त्यांची संमती सुद्धा मिळाली होती. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात यावा, अशी भूमिका संस्थेने घेतली असून त्यानुसार त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा, अशी विनंती संस्थेच्या सर्व सदस्यांनी केली आहे, असे विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी कळविले आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा १६ डिसेंबर रोजी नागपुरात होईल.

Web Title: Smita-Smruti Award for late Sampat Ramteke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.