स्मार्ट सिटी; मनपा व युरोपियन युनियनमध्ये करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:25 PM2018-05-24T15:25:44+5:302018-05-24T15:25:58+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत महापालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार व आयुक्त वीरेंद्र सिंग तर कार्लस्रूच्यावतीने आययूसीचे भारतातील कार्यक्रम संचालक पियर रॉबर्टो रेमिटा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Smart city; Agreement between Nagpur municipal Corporation and European Union | स्मार्ट सिटी; मनपा व युरोपियन युनियनमध्ये करार

स्मार्ट सिटी; मनपा व युरोपियन युनियनमध्ये करार

googlenewsNext
ठळक मुद्देशाश्वत शहरी विकास : स्मार्ट सिटी मिशनचा कृती आराखडा बनविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये बुधवारी इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला. नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील प्राथमिकतांमधील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत महापालिकेतर्फे महापौर नंदा जिचकार व आयुक्त वीरेंद्र सिंग तर कार्लस्रूच्यावतीने आययूसीचे भारतातील कार्यक्रम संचालक पियर रॉबर्टो रेमिटा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर आदी उपस्थित होते.
नागपूर आणि कार्लस्रू हे संयुक्तपणे विशेषत: शाश्वत शहरी विकास आणि भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात स्थानिक कृती योजना तयार करणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करण्याआधी आययूसीचे भारताचे प्रतिनिधी आशिष वर्मा (शाश्वत विकास तज्ज्ञ) यांनी प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली. सदर कार्यक्रमाचा उद्देश, अंमलबजावणीची प्रक्रिया आणि शहरांमध्ये असलेल्या समस्यांची माहिती दिली. पियर रॉबर्टो रेमिटा यांनी दिली तर रामनाथ सोनवणे यांनी नागपूर शहर, संधी आणि आव्हाने याबाबत माहिती दिली.
शहरी विकास आणि नगरपालिका सेवांना एकत्रित करण्यास प्राधान्य, कार्बनचा कमी वापर आणि शहरी नवीनीकरण, शाश्वत गतिशीलता याबाबत सविस्तर माहिती दिली. शहरी विकासाच्या प्राथमिकतांना अंमलात आणण्यासाठी त्यांना सर्वोत्तम धोरण ओळखण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आययूसी-भारत संघ आणि कार्लस्रू शहराने कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
नंदा जिचकार यांनी जागतिक हवामानातील बदल आणि शाश्वत शहरी विकासाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाकांक्षी पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागपूर शहरातील शाश्वत शहरी विकासाशी संबंधित मुद्यांबद्दल नागपूर शहर जाणून घेण्यासाठी व युरोपीय शहरांमध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भागीदारीमुळे नागपूर आणि कार्लस्रू हे शाश्वत शहरी विकासाशी संबंधित विषयांवर एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा वीरेंद्र सिंग यांनी व्यक्त केली.

Web Title: Smart city; Agreement between Nagpur municipal Corporation and European Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.