नागपुरात वृक्ष छाटणीला आळा; नवीन नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:28 PM2019-04-16T21:28:43+5:302019-04-16T21:35:11+5:30

गरज नसतानाही अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. छाटणीमुळे संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते.तसेच छाटणीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा विचार करता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने वृक्ष छाटणीसंदर्भात नवीन नियमावली तयार केली आहे. यात नऊ मार्गदर्शक सूचनाचा समावेश आहे.

Skipping tree set back in Nagpur; New rules | नागपुरात वृक्ष छाटणीला आळा; नवीन नियमावली

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी वृक्ष छाटणीसंदर्भात बैठकीत आढावा घेतला. उपस्थितात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख. कौस्तभ चॅटर्जी व मान्यवर

Next
ठळक मुद्देमनपाच्या नऊ मार्गदर्शक सूचनामोबाईल अ‍ॅपवर स्वीकारणार अर्जआवश्यक असेल तरच परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरज नसतानाही अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. छाटणीमुळे संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते.तसेच छाटणीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा विचार करता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने वृक्ष छाटणीसंदर्भात नवीन नियमावली तयार केली आहे. यात नऊ मार्गदर्शक सूचनाचा समावेश आहे.
छाटणीची परवानगी घेऊ न झाडांची संपूर्ण छटाई करण्याचे प्रकार सुरू आहे. यामुळे झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यासंदर्भात सेवाभावी संस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी वृक्ष छाटणी संदर्भात नवीन सूचना तयार केल्या आहेत. याच े पालन करण्याचे आवाहन यांनी नागरिकांना केले आहे. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने नागपुरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत नागरिकांतर्फे छाटणीच्या नावावर होत असलेली झाडांची कटाई आणि सिमेंट रस्ते बांधकामादरम्यान झाडांभोवती न सोडलेली जागा यावर ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी काही दिवसापूर्वी आयुक्तांशी चर्चा केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांचीही उपस्थिती होती. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता आयुक्तांनी झाडे छाटणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार आता कोणत्याही प्रकारच्या वृक्ष छाटणीसाठी केवळ अपरिहार्य परिस्थितीमध्येच परवानगी दिली जाईल. अर्जासोबत वृक्षांचे सर्व बाजूने घेतलेले कमीत कमी चार रंगीत छायाचित्र सादर करावे लागतील. नवीन बांधकामाचे नियोजन करताना भूखंडावर अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे स्थान विचारात घेऊन शक्यतोवर सदर वृक्ष छाटणीची आवश्यकता पडणार नाही, अशा पद्धतीने नकाशा तयार करण्यात यावा.
जर अस्तित्वातील वृक्षांमुळे नियोजित बांधकामामध्ये अडचण निर्माण होत आहे, या कारणामुळे संपूर्ण,अंशत: छाटणी प्रस्तावित असेल तर अर्जासोबत बांधकाम नकाशा सादर करावा. नकाशावर वृक्षांचे स्थान सुस्पष्टपणे दर्शवावे व वृक्षांमुळे बांधकाम करण्यात होणारी अडचण होते, हे नकाशावर रेखांकित करावे. अंशत: छाटणी करण्याच्या प्रकरणामध्ये वृक्षांचा जो भाग छाटणी करावयाचा आहे, तो भाग छायाचित्रावर रेखांकित करून दर्शविण्यात यावा. किरकोळ स्वरूपाच्या कारणासाठी वृक्षांच्या छाटणीकरिता परवानगी अनुज्ञेय राहणार नाही.
एकाच्या बदल्यात दहा वृक्ष लावा
कोणत्याही वृक्षांच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास पाच या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. व्यावसायिक बांधकामाकरिता वृक्षाच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास दहा, या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. तसेच किमान सहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करणे आवश्यक राहील. या पद्धतीने नवीन वृक्ष लागवड केल्याशिवाय संपूर्ण वृक्ष छटाईची परवानगी दिली जाणार नाही. सदर वृक्षाचे जतन, संगोपन व संरक्षण करण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारीही अर्जदाराची राहील.
अर्जासाठी मोबाईल अ‍ॅप
महापालिका  वृक्ष छाटणीचे अर्ज सादर करण्याकरिता मोबाईल अ‍ॅप तयार करणार आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. सदर मोबाईल अ‍ॅप वापरात आल्यानंतर लागवड केलेल्या नवीन वृक्षांचे छायाचित्र जीपीएस लोकेशनसहीत मोबाईल अ‍ॅपद्वारे सादर करणे आवश्यक राहील, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
सिमेंट रस्त्यातील झाडे मोकळी करा
शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामादरम्यान ज्या झाडांभोवती जागा सोडलेली नाही. अशा झाडांभोवती तातडीने जागा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंता आणि झोन सहायक आयुक्तांना मंगळवारी बैठकीत दिले. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी आढावा घेण्यात येईल. २३ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर यांच्यासह विभागप्रमुख, सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

 

 

Web Title: Skipping tree set back in Nagpur; New rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.