दसऱ्यानिमित्त सहा विशेष रेल्वेगाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:38 AM2018-10-15T10:38:18+5:302018-10-15T10:38:42+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Six special trains will run on the Dasara festival | दसऱ्यानिमित्त सहा विशेष रेल्वेगाड्या धावणार

दसऱ्यानिमित्त सहा विशेष रेल्वेगाड्या धावणार

Next
ठळक मुद्देनागपूर, पुणे, नाशिक, मुंबई मार्गावर अनुयायींसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-पुणे, नासिक रोड-नागपूर, मुंबई-अजनी, अजनी-मुंबई, मुंबई-नागपूर आणि नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनससाठी ६ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्य्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१०३० नागपूर-पुणे अनारक्षित रेल्वेगाडी नागपूरवरून १८ आॅक्टोबरला रात्री ११ वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड येथे थांबेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१०१२ मुंबई-अजनी विशेष रेल्वेगाडी मुंबईवरून १८ आॅक्टोबरला रात्री १२.२० वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता अजनीला येईल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदुर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम येथे थांबेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१०१२ अजनी मुंबई विशेष रेल्वेगाडी १९ आॅक्टोबरला रात्री ११.०५ वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी दुपारी २.४० वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नासिक रोड, ईगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१०७५ मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबईवरून १७ आॅक्टोबरला दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता नागपुरात पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, ईगतपुरी, नासिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम,अजनी येथे थांबेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१०१७ नासिक रोड-नागपूर विशेष रेल्वेगाडी नासिक रोड येथून १८ आॅक्टोबरला सकाळी ४.४५ वाजता सुटून दुपारी ३.१५ वाजता नागपूरला येईल. ही गाडी मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनीला थांबेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०१०१८ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १९ आॅक्टोबरला दुपारी २.१५ वाजता नागपूरवरून सुटून रात्री ३.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नासिक रोड, ईगतपुरी, कल्याण, ठाणे येथे थांबेल.

Web Title: Six special trains will run on the Dasara festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.