नागपुरातील सहा तर रामटेकमधील तीन उमेदवारांचे अर्ज रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 09:19 PM2019-03-26T21:19:30+5:302019-03-26T21:53:05+5:30

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवारी करण्यात आली. यात रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांचे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील पीपल पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Six candidates from Nagpur and three candidates from Ramtek canceled their nomination | नागपुरातील सहा तर रामटेकमधील तीन उमेदवारांचे अर्ज रद्द

नागपूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जांची छाननी करतांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. सोबत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी

Next
ठळक मुद्देरामटेकचे उमेदवार सचिन शेंडे यांनी घेतला अर्ज मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवारी करण्यात आली. यात रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांचे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील पीपल पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभेसाठी नामनिर्देशपत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत झाली. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर पार पडली.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. यामध्ये गोपाल अजाबराव तुमाने (अपक्ष), दीपचंद शेंडे (अपक्ष) आणि मीनाताई करणसिंह मोटघरे यांचा समावेश आहे. तर पीपल पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ३९ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. छाननीमध्ये सहा उमेदवारांचे अर्ज रद्द ठरले आहे. अर्ज रद्द ठरलेल्या उमेदवारांमध्ये खुशबू बेलेकर (बळीराजा पार्टी), आनंदराव खोब्रागडे (अपक्ष), मन्सूर जयदेव शेंडे (अपक्ष), नीलेश महादेव ढोके (अपक्ष), योगेश रमेश जयस्वाल (विश्वशक्ती पार्टी), कृष्णराव निमजे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
२८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी २८ मार्च ही शेवटची तारीख आहे.

Web Title: Six candidates from Nagpur and three candidates from Ramtek canceled their nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.