नागपुरात टँकरचा आकडा वाढण्याचे संकेत; पाऊस लांबल्यास वाढणार डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:52 AM2019-05-27T10:52:45+5:302019-05-27T10:53:14+5:30

पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे़ तसतशी विंधन विहीर व विहिरी अधिग्रहणाचे प्रस्तावांचा ढीग जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात लागायला सुरुवात झाली़ .

Significant increase in tanker numbers in Nagpur; If the rain lasts, headaches will increase | नागपुरात टँकरचा आकडा वाढण्याचे संकेत; पाऊस लांबल्यास वाढणार डोकेदुखी

नागपुरात टँकरचा आकडा वाढण्याचे संकेत; पाऊस लांबल्यास वाढणार डोकेदुखी

Next
ठळक मुद्देबोअरवेल दुरुस्ती व विहीर अधिग्रहण प्रस्तावात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे़ तसतशी विंधन विहीर व विहिरी अधिग्रहणाचे प्रस्तावांचा ढीग जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात लागायला सुरुवात झाली़ आतापर्यंत ३३७ प्रस्ताव दाखल झाले असून सर्व प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात आली आहे़ मात्र, या कामांच्या देयकासाठी जूनचा शेवटचा आठवडा निघेल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाची आहे़
अचानक विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावाचीही संख्या वाढल्याने प्रशासनाची प्रस्तावाला मंजुरी देताना धांदल उडत आहे़ प्रस्ताव, करारपत्रे तयार करणे व त्याला विषय समितीची मंजुरी घेणे या प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीच्या आहेत़ तसेच बोअरवेल खोदकामाचे मागणी प्रस्ताव रोज ग्रामपंचायतीकडून प्राप्त होत आहे़ आतापर्यंत विंधनविहीर आणि दुरुस्तीचे ३३७ प्रस्ताव प्राप्त झाले आणि तितक्याही कामांना मंजुरी देण्यात आली़ ३७२ बोअरवेलची कामे प्रगतिपथावर आहेत़ ३० मेपर्यंत अधिकाधिक कामे पूर्ण करण्यात येईल, असा आशावाद या विभागाला आहे़ दुसरीकडे रोज चार ते पाच टँकरमध्ये वाढ करण्याची मागणी येत असल्याने टँकर वाढविण्यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत आहे़ त्यामुळे टँकरची संख्या शंभरी पार करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे़ आठवडाभरात ही कामे झाल्यास टंचाईपासून काहीसा दिलासा गावकऱ्यांना मिळेल़ पाऊस लांबल्यास व कामे पूर्ण न झाल्यास प्रशासनाला गावकºयांच्या रोषाला बळी पडावे लागणार आहे़

प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीचा एक टॅँकर
जिल्ह्यात आतापर्यंत ४८ टँकरच्या माध्यमातून ३५ गावांना पाणी पुरवठा होत आहे. प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीचा केवळ एक टँकर आहे़ तो कामठी तालुक्यातील बिडगाव येथे धावतो़ त्या टँकरने आतापर्यंत ३७ दिवसांत १४१ फेºया पूर्ण केल्या आहेत. त्यावर ५९ हजार १३५ रुपयांचा खर्च प्रशासनाला आला़ चार हजार लिटर क्षमतेचा हा टँकर असून इतका मोठा खर्च प्रशासनाला न परवडणारी बाब आहे़ त्यामुळे खासगी कंत्राटदारांना पाणी पोहोचविण्याचे कंत्राट देण्यात येत असल्याची वस्तुस्थिती आहे़

Web Title: Significant increase in tanker numbers in Nagpur; If the rain lasts, headaches will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.