शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले ‘तडीपार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:41 PM2018-09-25T22:41:35+5:302018-09-25T22:42:48+5:30

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘तडीपार’ची कारवाई करीत त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आंदोलनकाळातील असून, दंगल घडविणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शांतता व सुव्यवस्था भंग करणे आदींमुळे सदर कारवाई करण्यात येत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. दुसरीकडे, ही राजकीय व्यक्तीविरुद्धची नागपूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळात पहिलीच कारवाई असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Shivsena District Deputy Chief Devendra Godbole 'Tadipar' | शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले ‘तडीपार’

शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले ‘तडीपार’

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय वर्तुळात खळबळ : आंदोलनादरम्यान नोंदविले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांच्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘तडीपार’ची कारवाई करीत त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आंदोलनकाळातील असून, दंगल घडविणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, शांतता व सुव्यवस्था भंग करणे आदींमुळे सदर कारवाई करण्यात येत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. दुसरीकडे, ही राजकीय व्यक्तीविरुद्धची नागपूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळात पहिलीच कारवाई असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र गोडबोले यांना ही नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ अन्वये बजावण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात भादंवि ३५३, ३४१, १४७, ३३२, ५० सहकलम १३५, १४३ सहकलम १३४, १३५, १०७, ११६ (३) अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. एक प्रकरण न्यायप्रविष्ट असून, दोन प्रकरणांचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.
मौदा परिसरात दंगल पसरविणे, गैरकायद्याची मंडळी गोळा करणे, सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करणे आदी कारणांमुळे गोडबोले यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. त्याअंतर्गत त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. मौदा परिसरातील शांतता व सुव्यवस्था कधीही भंग होण्याची शक्यता असल्याने, त्यांना एक वर्षासाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी दिले आहे.

गरिबांच्या हितासाठी लढत राहणार
मी आजवर जीही उपोषण, मोर्चे, आंदोलने केली, ती लोकशाही मार्गानेच केली आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यासाठी वेळोवेळी लढा उभारला आहे. अशाप्रकारच्या कितीही कारवाई माझ्याविरुद्ध केल्या तरी मी शेवटपर्यंत प्रकल्पग्रस्त व गरिबांच्या हितासाठी लढत राहणार आहे.
देवेंद्र गोडबोले
माजी जि.प. सदस्य.

Web Title: Shivsena District Deputy Chief Devendra Godbole 'Tadipar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.