नागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:05 PM2018-12-15T21:05:29+5:302018-12-15T21:06:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : युनिसेक्स सलूनच्या आडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाने मानेवाडा परिसरात शुक्रवारी ...

Sex racket exposed in Nagpur saloon | नागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

नागपुरातील सलूनमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्देतीन वारांगनासह आरोपी गजाआड : महिला आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युनिसेक्स सलूनच्या आडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका आरोपीला सामाजिक सुरक्षा विभागाने मानेवाडा परिसरात शुक्रवारी रात्री रंगेहात पकडले. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलाही यावेळी तेथे आढळल्या. सुनील ऊर्फ समीर राजू वाहणे (वय ३०, रा. यादवनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी छापा घातल्याची जाणीव होताच सुनीलची महिला साथीदार संगीता गोपीचंद गजभिये तेथून पळून गेली.
संगीता आणि सुनीलने मानेवाड्यातील तपस्या चौकाजवळच्या ईराई विहारजवळ शाईन युनिसेक्स सलून सुरू केले होते. पुरुषांना येथे बोलवून त्यांना शरीरसुखाचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांच्याकडून तगडी रक्कम वसूल केली जात होती. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला (एसएसबी) त्याची कुणकुण लागताच कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक आरोपींकडे पाठवले. त्याला वेश्या उपलब्ध करून देण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडून रक्कम घेतली आणि त्याला तीन तरुणी दाखविल्या. दरम्यान, बाहेर घुटमळत असलेल्या पोलिसांना संकेत मिळताच त्यांनी तेथे छापा घातला. यावेळी आरोपी सुनील तेथे तीन वारांगनांसोबत सापडला. त्याची साथीदार संगीता गजभिये मात्र पळून गेली. एसएसबीचे योगेश घोडके यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सुनील आणि संगीता गजभियेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

 

 

Web Title: Sex racket exposed in Nagpur saloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.