मुंबईतील एमडी तस्करासह सात जेरबंद : पावणेसहा लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:59 AM2019-07-14T00:59:47+5:302019-07-14T01:00:39+5:30

मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

Seven including Md smugglar from Mumbai arrested | मुंबईतील एमडी तस्करासह सात जेरबंद : पावणेसहा लाखांचा माल जप्त

मुंबईतील एमडी तस्करासह सात जेरबंद : पावणेसहा लाखांचा माल जप्त

Next
ठळक मुद्देसक्करदरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेफेड्रॉन (एमडी) या अत्यंत घातक तेवढ्याच महागड्या अमली पदार्थाची विविध राज्यात तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्करासह सात जणांना शनिवारी दुपारी सक्करदरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कार तसेच एमडी पावडरसह ५ लाख, ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
आकाश नारायण सिंग (वय २१, चकाला, अमृतनगर, स्नेहसदन - ३, अंधेरी ईस्ट, मुंबई), निहाल खान (वय २५, मोहननगर), अशरफ खान (वय २१), जाकिर शेख (वय ३२), अजहर खान (वय ३२), जॅकी ऊर्फ सलीम खान (वय २१, सर्व रा. सिंधीबन, मोठा ताजबाग) आणि बारिक चावल ऊर्फ शेख शहबाज (वय २२, रा. टीचर कॉलनी, मोठा ताजबाग) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. हे सर्व एमडीसारख्या घातक अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेले आहेत. त्यातील आकाश सिंग हा मोठा तस्कर असून, तो मुंबई, नागपूर आणि महाराष्ट्रच नव्हे तर ठिकठिकाणी एमडीची खेप पोहचवतो.
सक्करदरातील शामबाग मैदानाजवळ एक जीर्ण इमारत आहे. तेथे एमडीची मोठी खेप येणार असून, खरेदी विक्री केली जाणार असल्याचे पोलिसांना शनिवारी दुपारी कळले. त्यानुसार, परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदरा पोलिसांनी दुपारी २ च्या सुमारास तिकडे धाव घेतली. तेथे स्वीफ्ट कार (एमएच ३१/ एफए ८१८०) मध्ये काही जण पोलिसांना संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारची तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १९ . ४६० ग्राम मेफेड्रॉन पावडर आढळली. पोलिसांनी ती पावडर, तीन मोबाईल आणि कार असा एकूण ५ लाख, ८८ हजार, ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त सात जणांना अटक करण्यात आली असून, सय्यद तनजील आणि राजा गोल्डन ऊर्फ शेख नदीम हे दोघे पोलिसांची कुणकुण लागताच पळून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे.
तस्करी पुन्हा जैसे थे !
कुख्यात एमडी तस्कर आबूला अटक केल्यानंतर त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यांनी आपला धंदा गुंडाळल्याचा दावा केला जात होता. मात्र, आजच्या कारवाईतून सक्करदरातील एमडी तस्कर अजूनही पुर्वीसारखेच सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे त्यांच्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहायक आयुक्त धोपावकर, घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वात पीएसआय दिगांबर राठोड, एएसआय राजू डांगे, हवलदार प्रवीण कळंबे, संजय सोनवणे, राजेश कावळे, नायक संदीप बोरसरे, आनंद जाजुर्ले, शालिकराम शेंडे, कॉन्स्टेबल विद्याधर पवनीकर, राशिद शेख, मनोज ढोले आणि पवन लांबट आदींनी ही कामगिरी बजावली.
या कारवाईमुळे त्यांच्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहायक आयुक्त धोपावकर, घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्करदराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वात पीएसआय दिगांबर राठोड, एएसआय राजू डांगे, हवलदार प्रवीण कळंबे, संजय सोनवणे, राजेश कावळे, नायक संदीप बोरसरे, आनंद जाजुर्ले, शालिकराम शेंडे, कॉन्स्टेबल विद्याधर पवनीकर, राशिद शेख, मनोज ढोले आणि पवन लांबट आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Seven including Md smugglar from Mumbai arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.