नागपुरातील  माध्यमिक शिक्षण विभाग अनियंत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:59 PM2018-09-25T23:59:31+5:302018-09-26T00:05:49+5:30

नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षाही व्यस्त माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे कार्यालयही तेवढेच व्यस्त आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे विभागात सदैव वर्दळ असते. शिक्षणाधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने, कार्यालयीन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे कार्यालयात अव्यवस्था दिसते आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालयात लक्ष नाही आणि वरिष्ठांचे शिक्षणाधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेला भोंगळपणाची जाहीर चर्चा अख्ख्या जिल्हा परिषदेत आहे. याचा फटका अभ्यागताना बसतो आहे.

Secondary education department in Nagpur is uncontrolled | नागपुरातील  माध्यमिक शिक्षण विभाग अनियंत्रित

नागपुरातील  माध्यमिक शिक्षण विभाग अनियंत्रित

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे कार्यालयात आणि वरिष्ठांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाहीकार्यालयात अव्यवस्था, कागदपत्रांचेअडगळीत पडलेले गठ्ठे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षाही व्यस्त माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आहेत. शिक्षण अधिकाऱ्यांबरोबरच त्यांचे कार्यालयही तेवढेच व्यस्त आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमुळे विभागात सदैव वर्दळ असते. शिक्षणाधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने, कार्यालयीन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे कार्यालयात अव्यवस्था दिसते आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालयात लक्ष नाही आणि वरिष्ठांचे शिक्षणाधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात सुरू असलेला भोंगळपणाची जाहीर चर्चा अख्ख्या जिल्हा परिषदेत आहे. याचा फटका अभ्यागताना बसतो आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ संजय यादव यांनी जि.प.मध्ये झिरो पेंडेन्सी अभियान राबवून प्रत्येक कार्यालयातील फाईलींचा ढिगारा कमी करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परंतु जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागात फाईलींचा खच पडून आहे. फाईल्सचे कपाटही धुळीनी भरलेले असून, आलमाऱ्या तुटल्या आहते. विभागात प्रवेश करताच दरवाजातील कूलर, अडगळीत पडलेल्या फाईल्स असे दृश्य विभागात बघायला मिळते. तक्रारी घेऊन आलेले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची सदैव वर्दळ असते. कर्मचाऱ्यांच्या टेबलवर शिक्षक-कर्मचारी अभ्यागतांचा गराडा बघायला मिळतो. कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे हे आपल्या कॅबिनव्यतिरिक्त बाहेर कधी डोकावूनच पाहत नाही. कार्यालयातील महत्त्वाच्या फाईल्स उघड्यावर पडल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना नाही.
शिक्षणाधिकाऱ्यांनी अभ्यागतांना भेटण्यासाठी दुपारी ३ ते ५ ही वेळ दिली आहे. परंतु या वेळेत ते फार कमी उपलब्ध असतात, अशा तक्रारी अभ्यागतांनी केल्या आहेत. एका अभ्यागताने सांगितले की, दोन दिवसांपासून त्यांच्या कार्यालयीन वेळेत भेटायला येत आहे, पण ते त्या वेळात येतच नाही. शिक्षणाधिकारी फार कमी काळ विभागात असल्याचे अभ्यागतांचे म्हणणे आहे. विभागात सातत्याने होत असलेल्या बैठकांमध्ये ते व्यस्त असल्याचे कार्यालयातून सांगण्यात येते. कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायचे असेल तर कार्यालयीन वेळ संपल्यानंतर यावे.
 अधिकाऱ्यांच्या ‘पीए’ची भलतीच डिमांड
माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्यांचा पीए म्हणून वावरत असणाऱ्या एका स्टेनोग्राफरची भलतीच डिमांड आहे. साहेब बैठकीसाठी असो किंवा अन्य ठिकाणी पीएना सोबत घेऊन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. कार्यालयात साहेब नाही तर पीएही नसतात. त्यांनाही भेटण्यासाठी अभ्यागत ताटकळत असतात. साहेबांपेक्षा त्याचा दर्जाही काही कमी नाही, असे अभ्यागतांचे म्हणणे आहे.

Web Title: Secondary education department in Nagpur is uncontrolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.