स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नव्या जमिनीचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 02:06 AM2017-07-25T02:06:20+5:302017-07-25T02:06:20+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नवीन जागेचा शोध घेणे सुरू केले आहे.

The search for new land for the sports complex has started | स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नव्या जमिनीचा शोध सुरू

स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नव्या जमिनीचा शोध सुरू

googlenewsNext

सर्च समितीची होईल बैठक : विद्यापीठाच्या जमिनींची होईल पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नवीन जागेचा शोध घेणे सुरू केले आहे. यासाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली असून, २६ जुलैला समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीत स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी नवीन जागा शोधण्यासाठी समिती दौरासुद्धा करणार आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने अंबाझरी रोड येथील पांढराबोडीजवळ रिकाम्या असलेल्या जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बनविण्याचा विचार केला आहे. लोकमतने केलेल्या खुलाशानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी समितीची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यास सांगितले होते. परंतु डॉ. येवले हे पुण्याला गेले असल्याने बैठक होऊ शकली नाही. येवले सोमवारी पोहोचल्यानंतर या मुद्यावर चर्चा करण्यात आली.
विशेष म्हणजे विद्यापीठाच्या रविनगर येथील क्रीडा संकुलात स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी २६१ वृक्ष कापण्याची तयारी करण्यात आली होती. महापालिकेनेही कुठलीही शहानिशा न करता मंजुरी दिली होती. २१ जुलैला ‘लोकमत’ने ‘स्पोर्टस् कॉम्प्लेक्ससाठी कापणार २६१ वृक्ष’ या आशयाची बातमी प्रकाशित केली होती.
ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे कुठल्याही वादात पडण्यापेक्षा विद्यापीठाने नव्याने जमिनीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

Web Title: The search for new land for the sports complex has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.