नागपुरात ग्रीन बस संचालनासाठी स्कॅनिया उत्सुक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 01:16 AM2018-09-16T01:16:27+5:302018-09-16T01:17:49+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात महापालिका प्रशासन आहे. परंतु स्वीडनची स्कॅनिया कंपनीच यासाठी इच्छूक नाही.

Scania is not eager to operate a green bus in Nagpur | नागपुरात ग्रीन बस संचालनासाठी स्कॅनिया उत्सुक नाही

नागपुरात ग्रीन बस संचालनासाठी स्कॅनिया उत्सुक नाही

Next
ठळक मुद्देनवीन आॅपरेटरचा शोध : स्कॅनियाने बंगळुरू येथीय युनिट गुंडाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ग्रीन बस महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंद पडली आहे. ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात महापालिका प्रशासन आहे. परंतु स्वीडनची स्कॅनिया कंपनीच यासाठी इच्छूक नाही. अशा परिस्थितीत ग्रीन बस सुरू होण्याची शक्यता नाही.
स्कॅनियाने बंगळुरू येथे ग्रीन बस निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. हा प्रकल्प कंपनीने बंद केला आहे. स्कॅनिया कंपनीचा मुख्य व्यवसाय बस निर्मितीचा आहे. ही कंपनी बस संचालन करीत नाही. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव स्वीडनच्या अ‍ॅबेसी, स्कॅनियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस संचालनाला होकार दिला होता. परंतु बंगळुरू येथील उत्पादन बंद करण्यात आल्याने ग्रीन बस सुरू होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्कॅनिया कंपनी रेड बस आॅपरेटर ट्रॅव्हल्स टाइम पुणे ही कंपनी नागपुरातील ग्रीन बसचे संचालन करते. ठाणे शहरातही या कंपनीमार्फ त ग्रीन बस चालविली जाते. ही कंपनी नागपुरात ग्रीन बस संचालनासाठी इच्छूक आहे. परंतु स्कॅनिया कंपनीच्या सहमतीशिवाय ते शक्य नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार १८ आॅगस्ट २०१७ ला महापालिके ने स्कॅनिया कंपनीसोबत ग्रीन बस संचालनाचा १५ वर्षासाठी करार केला होता. स्कॅनियाने इस्त्रो खाते, जीएसटी सोबत थकीत रक्कम व सुसज्ज बस डेपोची सुविधा उपलब्ध न केल्याने महापालिके ला नोटीस बजावून ग्रीन बस सेवा बंद केली. त्यामुळे महापालिकेला कोणतीही कारवाई करता येत नाही. करारानुसार स्कॅनियाला वाटले तर त्रयस्त भागीदाराची नियुक्ती करून शहरात ग्रीन बस सुरू करू शकते. यासाठी प्रस्ताव सादर करण्याची गरज आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आॅपरेटरच्या माध्यमातून शहरात ग्रीन बस चालविण्याच्या तयारीत आहेत. आता यात परिवहन विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत परिवहन विभागाची प्रतिमा फारशी चांगली नाही. परिवहन समितीने परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी केली आहे.

१०.५० कोटींची थकबाकी
महापालिकेवर स्कॅनिया कंपनीची १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. यात प्रवासी भाड्याचे ७.५० कोटी, कराराच्यावेळी कंपनीने जमा के लेली अग्रीम रक्कम परत मागितली आहे. या संदर्भात महापालिकेला पत्र दिले आहे. ही थकबाकी स्कॅनिया कंपनीला परत करण्याची तयारी ट्रॅव्हल टाइमने दर्शविली आहे. यातून महापालिकेवरील थकबाकी कमी होईल. या मोबदल्यात ट्रॅव्हल टाइमने रेड बससाठी इस्त्रो खाते उघडण्याची मागणी केली आहे. या खात्यासाठी ९ कोटींची रक्कम लागणार आहे. परंतु ही अट महापालिकेला मंजूर नाही.

‘एजेंट ’ची भूमिका महत्त्वाची
ग्रीन बस इथेनॉलवर चालविली जाते. परंतु स्कॅनिया कंपनीतर्फे तयार करण्यात येणारे ‘एजेंट ’मिसळवल्यानंतरच बस चालते. संबंधित एजेंटचा फॉर्म्युला कंपनीने गुप्त ठेवला आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत या कंपनीकडून होकार मिळत नाही. तोपर्यंत दुसरा आॅपरेटर ग्रीन बसचे संचालन करू शकत नाही.

Web Title: Scania is not eager to operate a green bus in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.