शिवसेनेने मागितला कर्जमाफीचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:14 AM2017-08-23T01:14:05+5:302017-08-23T01:14:28+5:30

राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचा भरोसा नसल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले.

Savings account for demanded by Shivsena | शिवसेनेने मागितला कर्जमाफीचा हिशेब

शिवसेनेने मागितला कर्जमाफीचा हिशेब

Next
ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक : याद्या प्रसिद्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीवर शिवसेनेचा भरोसा नसल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक देत जिल्ह्यातील कर्जमाफीचा हिशेब मागितला. सोबत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या व कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची यादी जाहीर करण्याची मागणीही केली.
खा. कृपाल तुमाने, जिल्हा प्रमुख सतीश हरडे यांच्यासह संदीप इटकेलवार, राजेंद्र हरणे, हर्षल काकडे, वर्धराज पिल्ले, अशोक झिंगरे व शिवसैनिक अमरावती रोडवरील सहकार सदनवर धडकले. तेथे जिल्हा उपनिबंधक भोसले यांना घेराव घालत शेतकरी कर्जमाफीबाबतच्या प्रश्नांची सरबत्ती केली. प्रत्यक्षात सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करीत कर्जमाफीचा लाभ झाल्याचे पुरावेच मागितले. नागपूर जिल्ह्यातील किती शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली, किती शेतकºयांनी आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज केले, किती शेतकºयांना १० हजार रुपये पीक कर्ज देण्यात आले, या सर्वांची संपूर्ण माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यात कर्जमाफीची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नसून शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅनलाईन अर्ज करताना बºयाच केंद्रावर शेतकºयांकडून मनमानी पैसे वसूल करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. शिवसेना शेतकºयांच्या पूर्णपणे पाठीशी उभी असून शेतकºयांसाठी कितीही आंदोलने करावी लागली तरी ती करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Web Title: Savings account for demanded by Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.