पिकांच्या रक्षणासाठी साड्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:34 PM2017-10-14T12:34:02+5:302017-10-14T12:46:16+5:30

Sarees base for the protection of crops | पिकांच्या रक्षणासाठी साड्यांचा आधार

पिकांच्या रक्षणासाठी साड्यांचा आधार

Next
ठळक मुद्देनांद परिसरातील शेतकºयांची शक्कल वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला‘डिफेक्टिव्ह’ साड्यांची विक्री वाढलीकुंपणासाठी अनुदान मिळावे

राम वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिवापूर तालुक्यातील नांद परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने पिकांचे प्रचंड नुकसान होते. या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करताना शेतकºयांचा जीव मेटाकुटीस येतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही अवलंबल्या जातात. त्यातच नांद परिसरातील शेतकºयांनी त्यांच्या शेताला केलेल्या काटेरी कुंपणाला चक्क साड्या लावल्या आहेत. साड्यांचे हे कुंपण कुणाचेही लक्ष वेधून घेते.
शेतातील पीक घरी येईपर्यंत शेतकºयांना त्याची बरीच काळजी घ्यावी लागते. पूर्वी जंगलात किंवा जंगलालगतच्या परिसरात वावरणाºया वन्यप्राण्यांनी त्यांचा मोर्चा आता गावालगतच्या व अन्य शेतांकडे वळविला आहे. वन विभाग या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याकडे फारसे लक्ष देत नाही. पिकांचे नुकसान झाल्यास वन विभागाकडून नुकसान भरपाई फारशी मिळत नाही. मिळाल्यास तुटपुंजीच असते. त्यामुळे शेतकरी पिकांचे रक्षण करण्सासाठी जीवाचे रान करतात.
या भागात काही शेतकºयांनी त्यांच्या शेताला तारांचे कुंपण केले असून, शेतकरी काटेरी कुंपण करतात. या कुंपणाची वन्यप्राण्यांना फारशी भीती वाटत नाही. शिवाय, ते काटेरी कुंपण सहज ओलांडतात.
या प्राण्यांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी शेतकºयांनी कुंपणाला साड्या बांधायला सुरुवात केली आहे. रंगीबिरंगी साड्या बघून प्राणी शेतांकडे येण्यास धजावत नाही. हवेमुळे या साड्यांचा आवाजही होतो. या साड्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत.

‘डिफेक्टिव्ह’ साड्यांची विक्री वाढली
या कुंपणासाठी शेतकºयांना बºयाच साड्यांची गरज भासते. मग, एवढ्या साड्या आणायच्या कुठून, असा प्रश्न उपस्थित होते. हल्ली काही कंपन्यांच्यावतीने ‘डिफेक्ट’ साड्यांचे सेल लावले जातात. या साड्या प्रति नग १० रुपयाला सहज मिळतात. ही किंमत शेतकºयांच्या आवाक्यातील आहे. त्यामुळे शेतकरी या कुंपणासाठी ‘डिफेक्ट’ साड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.


कुंपणासाठी अनुदान मिळावे
वन्यप्राणी दरवर्षी पिकांची नासाडी करतात. त्यातून शेतकºयांचे नुकसान होते. या सर्व बाबी शासन व प्रशासनाला माहीत आहे. मात्र, वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. तशी प्रशासनाची मानसिकताही नाही. त्यामुळे शासनाने गरजू शेतकºयांना कुंपणासाठी काटेरी तारा किंवा सौर ऊर्जेचे कुंपण अनुदानावर द्यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Sarees base for the protection of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.