वाळू माफियांचे ट्रक सापडले रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:08 AM2019-04-25T01:08:25+5:302019-04-25T01:09:07+5:30

महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान वाळू माफियाद्वारा सोडविण्यात आलेले ट्रक पोलिसांना रिकामे सापडले. त्यातील वाळू चोरण्यात आल्याने या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, नायब तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मर्सिडिज कार व त्याच्या आरोपी चालकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

Sand Mufiya's truck found empty | वाळू माफियांचे ट्रक सापडले रिकामे

वाळू माफियांचे ट्रक सापडले रिकामे

Next
ठळक मुद्देवाळू तस्करी प्रकरण : मर्सिडिज चालकाचा अद्याप पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान वाळूमाफियाद्वारा सोडविण्यात आलेले ट्रक पोलिसांना रिकामे सापडले. त्यातील वाळू चोरण्यात आल्याने या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, नायब तहसीलदारास चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मर्सिडिज कार व त्याच्या आरोपी चालकाचा अद्याप शोध लागलेला नाही.
मंगळवारी सकाळी उमरेड रोडवर खरबीमध्ये नायब तहसीलदार सुनील साळवे आपल्या चमूसोबत वाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोहोचले. त्यांना पाहून बहुतांश ट्रक चालक फरार झाले. ट्रक क्रमांक एमएच ४०/एके ८०५६ आणि एमएच ३६/एफ/४१५७ हे महसूल अधिकाऱ्यांच्या हाती लागले. साळवे आणि त्यांची चमू ट्रक चालकास रॉयल्टीचे दस्तावेज मागत होते. त्याच वेळी कत्थ्या रंगाची एक मर्सिडिज कार (एमएच ४१/८१०० ) तिथे आली. कार चालकाने नायब तहसीलदारासह त्यांच्या चमूला चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत तेथून परतून लावले होते.
नंदनवन पोलिसांनी मंगळवारीच शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांना तपासादरम्यान मर्सिडिज कार नाशिक येथील कविता कारे नावाच्या महिलेच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पोलिसांना बुधवारी घटनास्थळापासून काही अंतरावर दोन्ही ट्रक सापडले. परंतु त्यातील वाळू मात्र गायब होती तसेच ट्रकच्या नंबरचीही खाडाखोड करण्यात आली आहे.
काही दिवसाची शांतता
या घटनेनंतर वाळू माफिया सध्या शांत झाले आहेत. पोलीस आणि महसूल विभागाकडून धरपकड होण्याच्या शंकेमुळे बुधवारी वाळू तस्करीशी संबंधित एखाद दुसरेच वाहन रस्त्यावर दिसून आले. पोलीस आणि महसूल विभागाची ही दहशत केवळ काही दिवसांपुरती मर्यादित राहते, नंतर सर्वकाही नेहमीप्रमाणे चालते.

Web Title: Sand Mufiya's truck found empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.