विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलने दिली डीएमईआरला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 09:08 PM2018-11-27T21:08:00+5:302018-11-27T21:11:04+5:30

विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sale of Unregistered Drugs: Medical information provided to DMER |  विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलने दिली डीएमईआरला माहिती

 विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलने दिली डीएमईआरला माहिती

Next
ठळक मुद्देएफडीएच्या कारवाईने खळबळ

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख असलेले डॉ. प्रशांत टिपले हे सुटी व रविवार दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ‘इशा मार्इंड केअर’ नावाच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना सेवा द्यायचे. डॉ. टिपले विनापरवाना औषधांची विक्री करीत असल्याची तक्रार ‘एफडीए’ला मिळाली. त्या आधारे त्यांनी रविवार २५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या क्लिनिकवर धाड टाकून कारवाई केली. यावेळी १२ हजार रुपयांची औषधे व ११ बिलबुकही जप्त केले. पकडलेल्या सर्व औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ‘एफडीए’चे म्हणणे आहे. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त (औषधी) डॉ. राकेश तिरपुडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरचे सहआयुक्त श्रीकांत फुले व नागपूरचे सहआयुक्त पी.एम.बल्लाळ यांनी केली. कारवाईचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच मेडिकल प्रशासनाने गंभीरतेने घेतले. मंगळवारी या प्रकरणाची माहिती ‘डीएमईआर’ला पाठविली आहे. याला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दुजोरा दिला आहे. पहिल्यांदाच मेडिकलच्या डॉक्टरच्या क्लिनिकवर ‘एफडीए’ची धाड पडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sale of Unregistered Drugs: Medical information provided to DMER

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.