ओतलेल्या दुधात पाणी किती आणि दूध किती, हे मला चांगलंच माहितीय- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 01:10 PM2018-07-16T13:10:30+5:302018-07-16T16:45:07+5:30

आंदोलनात शेतकरी कमी व पक्षाचे कार्यकर्ते जास्त असल्याचा आरोप

sadabhau khot slams raju shetty on milk supply strike | ओतलेल्या दुधात पाणी किती आणि दूध किती, हे मला चांगलंच माहितीय- सदाभाऊ खोत

ओतलेल्या दुधात पाणी किती आणि दूध किती, हे मला चांगलंच माहितीय- सदाभाऊ खोत

नागपूर: स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून  राज्यात पुकारलेले दूध आंदोलन येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नागपूर येथील अधिवेशनात प्रसिद्धीमाध्यमांसोबत बोलताना केला.

सभागृहाच्या परिसरात बोलताना त्यांनी, गेल्या तीस वर्षांपासून आपण आंदोलनातूनच वाटचाल करीत आहोत, टँकरमधून दूध कसे फेकायचे, त्यात किती पाणी व किती दूध असतं हे आम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे या आंदोलनाला फारसं महत्त्व नाही, असं मत व्यक्त केलं. 

आंदोलनात शेतकरी कमी व पक्षाचे कार्यकर्ते जास्त असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी सरकारला नोटीस द्यायला हवी होती, चर्चेतून प्रश्न सोडवता आला असता पण त्यांनी असे न करता हे आंदोलन सुरू केले. चर्चेसाठी सरकार केव्हाही तयार आहे असे ते पुढे म्हणाले.

Web Title: sadabhau khot slams raju shetty on milk supply strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.