तरुणाईच तोडते वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:36 AM2018-08-18T10:36:31+5:302018-08-18T10:39:47+5:30

उपराजधानीत युवक सर्वाधिक वाहतूक नियम तोडत आहेत. पालकही आपल्या मुलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ताकीद देताना दिसत नाहीत. यामुळेच बुलेट चालकांकडून पोलिसांवर हल्ला केल्याच्या किंवा बेजबाबदारपणाने वाहन चालविण्याच्या घटना घडत आहेत.

The rules for traffic breaks by youth | तरुणाईच तोडते वाहतुकीचे नियम

तरुणाईच तोडते वाहतुकीचे नियम

googlenewsNext
ठळक मुद्देचौकात ‘साऊंड सेन्सर’ची मागणी वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्याशी बातचित

जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत युवक सर्वाधिक वाहतूक नियम तोडत आहेत. पालकही आपल्या मुलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत ताकीद देताना दिसत नाहीत. यामुळेच बुलेट चालकांकडून पोलिसांवर हल्ला केल्याच्या किंवा बेजबाबदारपणाने वाहन चालविण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वाहतूक पोलिसांच्यावतीने आगामी दिवसात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी ‘लोकमत’शी बातचित करताना ही माहिती दिली.
रोशन यांनी आठवडाभरापूर्वी वाहतूक पोलीस उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी गुन्ह्यांवर नियंत्रण आणि वाहतुकीला प्राधान्यक्रम दिला आहे. यामुळेच आयपीएस अधिकारी रोशन यांना वाहतूक विभागात तैनात करण्यात आले आहे. रोशन म्हणाले, उपराजधानीत वाहतूक नियम तोडणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक आहे. ट्रिपल सिट किंवा लायसन्स नसताना वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे, झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन करण्याची सवय युवकांनाच अधिक आहे. पालकही आपल्या मुलांना याबाबत सल्ला देताना दिसत नाहीत. कोणताच विचार न करता आपल्या अल्पवयीन मुलांना वाहनाची चावी सोपवितात. यात दुचाकींची संख्या अधिक आहे. वाहन चालविण्याच्या नियमांचे पालन न केल्यामुळे सर्वाधिक युवक अपघाताचे बळी ठरतात. अनेकदा त्यांच्या बेजबाबदारपणे वाहन चालविण्यामुळे दोष नसलेल्या व्यक्तीही शिकार ठरतात. परंतु आता वाहतूक पोलीस या सर्व बाबी गंभीरपणे हाताळणार आहे. अशा परिस्थितीत पोलीस पालकांकडून पुन्हा वाहन सोपविणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत. परंतु आता वाहतुकीच्या नियमांबाबत रस्ता सुरक्षा दलाच्या माध्यमातून जागरुकता करण्यासोबत नियमांचे पालन करून घेण्यासाठी पोलीस प्रत्येक पाऊल उचलणार आहेत. पोलीस जागरुकता आणि सक्ती या दोन्ही सिद्धांतानुसार काम करणार आहेत. नुकताच शहरात बुलेट चालकांनी हैदोस घातला आहे. बुलेट चालकांनी आठवडाभरात वाहतूक पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. ते बुलेटचे सायलेन्सर बदलवून त्याच्या आवाजाने दहशत निर्माण करतात. स्टंटबाजी करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतात. वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणाले, अशा नागरिकांना धडा शिकविण्यासाठी आगामी दिवसात विशेष मोहीम चालविण्यात येणार आहे. बुलेट चालकासोबत पोलीस सायलेन्सर बदलविणाऱ्या मेकॅनिक विरुद्धही कडक कारवाई करणार आहे.
त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पानुसार लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबत ‘साऊंड सेंसर’ लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. शहराच्या प्रमुख चौकात ‘साऊंड सेंसर’ लावण्यात येतील. त्यांच्या माध्यमातून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. त्यांनी पोलीस अधिकाºयांवर हल्ल्याच्या घटना गंभीर असल्याचे सांगून अशा घटनांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचे सांगितले. चिरीमिरी घेण्याची आणि चौकात उभे राहून कर्तव्य न बजावता दुचाकी चालकांना पकडण्याच्या वाहतूक पोलिसांच्या प्रवृत्तीबाबत रोशन यांनी ही प्रवृत्ती सहन केल्या जाणार नसल्याचे सांगितले. पोलिसांची प्रतिमा तयार करण्यात वाहतूक पोलिसांचे योगदान महत्त्वाचे आहे. या पद्धतीने वाहतूक पोलिसांनी आपली वर्तणूक ठेवावी. भ्रष्टाचाराची तक्रार गंभीरपणे घेतल्या जाईल. मेट्रो प्रकल्पामुळे अपघात वाढल्याबाबत विचारणा केली असता रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. रोशन यांनी आयआयटी खडकपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक कम्युनिकेशनमध्ये एम.टेक. केले आहे. २०१३ मध्ये भारतीय पोलीस सेवेत ते सामील झाले. पोलीस सेवेत सामील होण्यापूर्वी ते खासगी संस्थेत कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी जर्मनी, इटली येथे शिक्षण घेतले आहे.

नागपूर पोलिसांनी बनविला रेकॉर्ड
१५ आॅगस्टला राज्यात सर्वाधिक कारवाई करण्याचा वाहतूक पोलिसांनी रेकॉर्ड केला आहे. वाहतूक पोलिसांनी दिवसभरात ४६४५ वाहन चालकांवर कारवाई केली. रोशन म्हणाले की, वाहतूक नियमांचे पालन केल्यास जीिवतहानी टाळल्या जाऊ शकते. त्यांचे लक्ष्य कारवाई किंवा रेकॉर्ड बनविणे नाही तर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरुकता निर्माण करणे आहे. त्यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. पोलीस नागरिकांच्या मदतीसाठी आहेत. त्यांनी वाहतुकीबाबतच्या कोणत्याही समस्येसाठी किंवा तक्रारीसाठी ९०११३८७१०० या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

Web Title: The rules for traffic breaks by youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.