नागपुरात अ‍ॅमेझॉन कंपनीला ७.६३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:02 AM2019-05-16T11:02:15+5:302019-05-16T11:03:16+5:30

ऑनलाईन उत्पादनांची विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वस्तूंची ग्राहकांना डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीची ७.६३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Rs. 7.63 lacs fraud to Amazon company in Nagpur | नागपुरात अ‍ॅमेझॉन कंपनीला ७.६३ लाखांचा गंडा

नागपुरात अ‍ॅमेझॉन कंपनीला ७.६३ लाखांचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देडिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन उत्पादनांची विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वस्तूंची ग्राहकांना डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीची ७.६३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी कर्मचारी ग्राहकांनी रद्द केलेल्या ऑर्डरच्या वस्तूंऐवजी दुसऱ्या वस्तू कंपनीला पाठवून सात महिन्यांपासून कंपनीची फसवणूक करीत होते. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
आकाश गोविंदराव निमजे (२४) पाचपावली, नरेश कडू (३२) जरीपटका, यशवंत शिखाराम धार्मिक (२१) शांतिनगर, रूपेश सुधाकर सावरकर (२५) इतवारी आणि हर्षल जागेश्वर आत्राम (२५) पाचपावली, अशी आरोपींची नावे आहेत.
अ‍ॅमेझॉन कंपनीने डिपोंडा लॉजेस्टिक कंपनीकडे ग्राहकांना वस्तूंची डिलिव्हरी करण्याचे काम सोपविले आहे. डिपोंडामध्ये कळमना येथील रहिवासी भोजराज माकडे टीम लीडर आहे. सर्व आरोपी माकडे यांच्याकडे डिलिव्हरी देण्याचे काम करीत होते. ग्राहक अनेकदा ऑनलाईन ऑर्डर रद्द करतात. अशावेळी सर्व वस्तू कंपनीला परत पाठविण्यात येतात. आरोपींनी २ मे ते २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ग्राहकांनी परत केलेल्या ७ लाख ६३ हजार २७३ रुपयांच्या वस्तू आपल्याजवळ ठेवल्या आणि त्याऐवजी दुसऱ्या वस्तू पॅक करून कंपनीला पाठविल्या. कंपनीने तपासणी केल्यानंतर आरोपींनी फसवणूक केल्याचे आढळून आले. याप्रकरणी माकडे यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Rs. 7.63 lacs fraud to Amazon company in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.