संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:41 PM2018-12-06T23:41:07+5:302018-12-06T23:43:14+5:30

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.

The role of the RSS, Babasaheb was Antyodaya's founder | संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

Next
ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी अभिवादन : त्यांच्यासारखेच आज देशाला नेते हवेत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.
संघाच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर ही भूमिका मांडण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांना केवळ संविधाननिर्माते या चौकटीत बसवणे अयोग्य ठरेल. त्यांनी युगान्युगे जाती व वर्ण व्यवस्थेच्या जोखडात फसलेल्या भारताला याबाबत विचार करायला भाग पाडले. ते महान शिक्षक, अर्थतज्ज्ञ, वक्ता, द्रष्टे नेता होते. शालेय जीवनात त्यांना सर्व प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागता. मात्र त्यांनी दृढनिष्ठा ठेवली व ते स्वनिर्मित व्यक्तिमत्त्वाचे आदर्श उदाहरण बनले. भारतात समानता यावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. तत्कालीन भारतातील अस्पृश्य व वंचितांची स्थिती लक्षात घेता त्यांनी आरक्षणाची व्यवस्था तयार केली. सोबतच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील कार्य केले, असे संघाने अभिवादन करताना म्हटले आहे.
बाबासाहेब राष्ट्रनिर्माता होते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वास्तविकपणे केवळ दलित नेतेच नव्हते, तर राष्ट्रनिर्माता व जागतिक नेते होते. त्यांनीच सामाजिक न्यायाचे सिद्धांत दिले. भारत निर्माणाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचे मौलिक योगदान होते. आजच्या युगात त्यांच्या विचार अंगिकारण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या प्रगतीसाठी डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांची आवश्यकता असल्याचे मत संघातर्फे मांडण्यात आले आहे.

Web Title: The role of the RSS, Babasaheb was Antyodaya's founder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.