रोबोट, पेन ड्राईव्ह अन् टीव्ही रिमोट निवडणूक चिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:21 AM2019-03-19T00:21:26+5:302019-03-19T00:24:09+5:30

राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांसोबतच रोबोट, पेन ड्राईव्ह, टीव्हीचा रिमोट, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वीच बोर्ड यासारखे निवडणूक चिन्हसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये राहणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांमध्ये अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे.

Robots, Pen Drives and TV Remote Elections Icon | रोबोट, पेन ड्राईव्ह अन् टीव्ही रिमोट निवडणूक चिन्ह

रोबोट, पेन ड्राईव्ह अन् टीव्ही रिमोट निवडणूक चिन्ह

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने जारी केली मुक्त चिन्हेसीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्युटर माऊस, स्वीच बोर्डचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांसोबतच रोबोट, पेन ड्राईव्ह, टीव्हीचा रिमोट, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वीच बोर्ड यासारखे निवडणूक चिन्हसुद्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये राहणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांमध्ये अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे.
निवडणुकीमध्ये निवडणूक चिन्हाला अतिशय महत्त्व आहे. या चिन्हाद्वारेच उमेदवारांना लोकांपर्यंत व मतदारापर्यंत पोहोचण्यात सोपे जाते. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह हे ठरलेले आहे. परंतु लहान लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी मात्र निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीत चिन्ह जारी केले जातात. यासाठी निवडणूक आयोगाने मुक्त निवडणूक चिन्हे जारी केली आहेत. उमेदवारांची अंतिम यादी जारी झाल्यानंतर त्यांना चिन्ह वितरित केले जातील. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक मुक्त चिन्हांमध्ये ३७ मुक्त चिन्हांचा समावेश आहे.
यामध्ये अ‍ॅप्पल (सेफ), ब्रेड टोस्टर, सीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर माऊस, डोअर डॅण्डल, इयर रिंग्स, फुटबॉल, फुटबॉल प्लेयर, ऊस शेतकरी, हॅण्ड क्राफ्ट, हेलिकॉप्टर, फणस, केटली, लेडीस पर्स, लॅपटॉप, ल्युडो, रबर स्टॅम्प, शिप, सितार, शटर, सोफा, स्पॅनर, क्रिकेट स्टम्प, स्वीच बोर्ड, ट्यूबलाईट, भालाफेक, वॉटर टँक आदी चिन्हांचा समावेश आहे.

 

Web Title: Robots, Pen Drives and TV Remote Elections Icon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.