नागपुरात सेवानिवृत्त अधिकारी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:44 AM2018-04-19T01:44:38+5:302018-04-19T01:45:40+5:30

सिद्धेश्वरनगर नंदनवन येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त अधिकारी आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले.

Retired officers in Nagpur were found dead in the flat | नागपुरात सेवानिवृत्त अधिकारी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले

नागपुरात सेवानिवृत्त अधिकारी फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले

Next
ठळक मुद्देआयुध निर्माणीत होते अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिद्धेश्वरनगर नंदनवन येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त अधिकारी आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडले.
स्वदेशकुमार गुप्ता (७१) असे मृत सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. ते आयुध निर्माणी येथून सेवानिवृत्त झाले होते. ते सिद्धेश्वरनगर येथील सिद्धेश्वर अर्पामेंटमध्ये राहत होते. पोलीस सूत्रानुसार सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुलं आहेत. एक भंडारा येथे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतो तर दुसरा मुंबईत राहतो. बुधवारी सकाळी ८ वाजता शेजाºयांना गुप्ता यांच्या फ्लॅटसमोर तीन दिवसांपासूनच वर्तमानपत्र पडून असल्याचे दिसून आले. गुप्ता हे नियमित वर्तमानपत्र वाचत होते. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी आवाज दिला. परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नंदनवन पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनीही दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. त्यांनाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा गुप्ता यांचा मृतदेह शौचालयात पडून होता. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. भंडारा येथे राहणाºया मुलाला सूचना देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरूनच आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Retired officers in Nagpur were found dead in the flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.